वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पीयूष गोयल यांनी औषधनिर्माण आणि संघटनांच्या प्रमुखांशी साधला संवाद


आत्मनिर्भर भारतमध्ये औषध निर्मिती उद्योगाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे केले प्रतिपादन

Posted On: 31 MAY 2020 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 मे 2020

 

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे औषध निर्मिती उद्योगांचे प्रमुख आणि औषध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीला राज्यमंत्री एच.एस.पुरी आणि वाणिज्य आणि औषधनिर्माण विभागाचे सचिव सोम प्रकाश  आणि वाणिज्य, औषधनिर्माण आणि आरोग्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आपल्या संवादा दरम्यान गोयल यांनी कोविड संकटाच्या वेळी प्रसंगी धावून आल्याबद्दल आणि भारताला अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल औषध निर्माण उद्योगाचे कौतुक केले. ते म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांत 120 पेक्षा जास्त देशांना भारताकडून काही अत्यावश्यक औषधे पुरवण्यात आली आणि त्यापैकी 40 देशांना औषध अनुदान स्वरूपात मोफत पुरवण्यात आल्यामुळे भारत ‘फार्मसी ऑफ द वर्ल्ड’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, ते म्हणाले की, या संकटाच्या काळात निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तू लवकरात लवकर पोहोचाव्यात यासाठी परकीय व्यापार महासंचालक, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय , आरोग्य आणि कार्मिक विभागाचे अधिकारी अहोरात्र काम करत होते. संपूर्ण जगाने भारताच्या मदतीची प्रशंसा केली आणि यामुळे भारताची सद्भावना आणि प्रतिष्ठा वृद्धिंगत झाली आहे. ते म्हणाले की, भारताकडे एचसीक्यू आणि पीसीएमची पुरेशी उत्पादन क्षमता आणि  देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी मुबलक साठा होता आणि  सर्व गरजू राष्ट्रांना औषधे उपलब्ध करुन देता यावीत आणि कोणतेही अनैतिक घटक विनाकारण साठा करू नयेत यासाठी त्यांच्या निर्यातीवर निर्बंध घालुन या काळात  देशाला कोणत्याही प्रकारची औषधाची कमतरता भासू नये यासाठी औषध निर्माण उद्योगाने केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल गोयल यांनी कौतुक केले. ते  म्हणाले की लॉकडाऊन लवकर घोषित केल्यामुळे देशात साथीच्या रोगाचा फैलाव रोखण्यात  आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधा तसेच क्षमता वाढवण्याबरोबरच सावधगिरी आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात मदत झाली. गोयल पुढे म्हणाले की, कोविड -19 च्या व्यवस्थापनात सक्रिय राहण्यात आणि याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी कल्याण व मदत पॅकेज  जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम मार्गदर्शन  आणि नेतृत्वाखाली भारताने एक उदाहरण घालून दिले आहे. 

गोयल यांनी उद्योगाला आश्वासन दिले की सरकार उद्योगाचा विस्तार, वैविध्यकरण आणि मजबुतीकरणात पूर्ण सहकार्य करेल. ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारत अभियानात या उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. सरकारने या संदर्भात अनेक  पावले उचलली आहेत, त्यामुळे एपीआयमध्ये देश  लवकर आत्मनिर्भर व्हायला हवा. 3 बल्क ड्रग्स पार्क्समध्ये पायाभूत  सुविधांसाठी अर्थसहाय्य पुरवण्यासाठी बल्क ड्रग्स पार्क्सच्या प्रोत्साहन योजनेला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. तसेच, देशातील महत्वपूर्ण केएसएम / ड्रग इंटरमीडिएट्स आणि एपीआयच्या देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादन संलग्न  प्रोत्साहन योजनेलाही मंजुरी  देण्यात आली आहे.

मंत्री म्हणाले की अँटी डम्पिंग तपास प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय परकीय व्यापार कराराच्या बाबतीत, कोणतेही अडथळे किंवा अन्यायकारक स्पर्धा आढळली तर सरकारला कळवा आणि त्याविरोधात त्वरित उपाययोजना करण्यात येईल. ते म्हणाले की त्यांनी पूर्व युरोप आणि रशियामधील मोठ्या आणि फारशी माहिती नसलेल्या बाजारपेठांकडे वळावे. संशोधन आणि विकास प्रयत्नांमध्ये सहकार्याचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन करीत गोयल म्हणाले की शिक्षणतज्ज्ञ , विद्यापीठे, आयसीएमआर आणि खाजगी क्षेत्राने एकत्र यावे . सरकारने  काही फार्मा पीएसयूमध्ये निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देताना, मंत्री म्हणाले की, भारतीय कंपन्यांना पीएसयूचा वापर उत्पादनाच्या अँड प्ले मॉडेलसाठी करण्यासाठी आमंत्रित केले. बैठकीत सादर केलेल्या सर्व सूचना त्वरित तपासल्या जातील आणि जिथे आवश्यक असेल तेथे आंतरमंत्रालयांशी सल्लामसलत लवकरात लवकर पूर्ण केली जाईल. अशी ग्वाही त्यांनी उद्योगांना दिली.

 

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1628228) Visitor Counter : 158