विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड चाचणी संख्या वाढवण्यासाठी राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळा आणि विद्यापीठांमध्ये नमुने घेण्याची सुविधा

Posted On: 30 MAY 2020 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2020

संपूर्ण देशभरात कोविड-19 च्या चाचण्या मोठ्या संख्येने करणे शक्य व्हावे यासाठी सर्व सरकारी संस्थांमध्ये संशयित रुग्णांचे नमुने घेण्याची सुविधा करण्यात आली आहे. यासाठी शहरांमध्ये तसेच क्षेत्रीय भागात कोविड तपासणी केंद्रे उघडण्यात आली आहेत. ज्या संस्था आणि प्रयोगशाळांकडे तपासणी करू शकतील, अशा तज्ज्ञ लोकांची उपलब्धता आहे, अशा सर्व संस्थांचा उपयोग करण्यात येत आहे. कोविड-19 चाचणीसाठी नमुने घेणे, त्यांचा संग्रह करणे, या नमुन्यांना हाताळण्याची प्रक्रिया (बीएसएल-2 सुविधा) आणि चाचणी (आरटी-पीसीआर) अशा दोन्हींची क्षमता आणि कौशल्य असलेल्या संस्था व प्रयोगशाळा कोविड चाचणी केंद्र म्हणून कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये 'आरटी-पीसीआर' यंत्र आणि आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहे. यापैकी अनेक प्रयोगशाळांच्या कामाचा विस्तार करण्यात आला आहे.

या सर्व हब्सना, सरकारी प्रयोगशाळांना संबंधित मंत्रालयांनी आणि विभागांनी  ‘आयसीएमआर’ने  दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून परवानगी देण्यात आली आहे. या चाचणी केंद्रांना डीबीटी, डीएसटी, सीएसआयआर, डीएई, डीआरडीओ, आयसीएआर आदि संस्थांनी मान्यता दिली आहे. अशा प्रकारे जवळपास 19 शहरे आणि क्षेत्रीय स्थानी चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये बेंगळूरू, दिल्ली- एनसीआर, हैद्राबाद, तिरूवनंतपुरम, चंदिगड-मोहाली, भुवनेश्वर, नागपूर, पुणे, मुंबई, लखनौ, चेन्नई, कोलकाता, ईशान्य क्षेत्र, जम्मू आणि काश्मिर, अहमदाबाद, मध्य प्रदेश, राजस्थान, बनारस, पालमपूर आणि दिल्ली शहर याठिकाणी कोविड चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

आत्तापर्यंत 100 चाचणी संस्थांमधून 1,60,000 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. आयसीएमआरने सात डीबीटी स्वायत्त संस्थांना तपासणी केंद्र म्हणून दिली आहे. या सर्व केंद्रांमध्ये कोविड-19 च्या चाचण्या केल्या जात आहेत. (आरजीसीबी, टीएचएसटीआय, आयएलएस, इनस्टेम, एनसीसीएम, सीडीएफडी, एनआयबीएमजी या संस्थांमध्ये कोविड-19च्या  निदान चाचणी घेतली जात आहे.)

या संस्थांच्यावतीने आपल्या शहरांमध्ये तसेच विभागामध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या संबंधित संस्थांबरोबर समन्वय साधून कार्य केले जात आहे. आपल्या शहर, विभागातल्या नमुन्यांचा संग्रह करणे, त्यांचे परीक्षण करणे आणि त्या चाचणीचे अहवाल दररोज ‘आयसीएमआर’कडे पाठवण्याचे काम केले जात आहे. या समुहांनी गेल्या 4 आठवड्यांमध्ये जवळपास 1,70,000 चाचण्या केल्या आहेत. या समुहांची संख्या आगामी 4 आठवड्यांमध्ये जवळपास 50 करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये अगदी दुर्गम भागामध्येही कोविड-19 चाचणी करणे शक्य होणार आहे.

अधिक माहितीसाठी: संपर्क पथक डीबीटी / बीआयआरएसी

 

S.Pophale/S.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1627921) Visitor Counter : 290