शिक्षण मंत्रालय

ईशान्येकडील राज्यांमधल्या विद्यार्थ्‍यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण आणि पायाभूत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यास सरकार वचनबद्ध - मनुष्यबळ विकास मंत्री

Posted On: 26 MAY 2020 6:43PM by PIB Mumbai

 

संपूर्ण देशभरातल्या आणि विशेषतः ईशान्येकडील राज्यांमधल्या विद्यार्थ्‍यांना  गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण आणि पायाभूत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यास सरकार वचनबद्ध आहे, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज सांगितले.  यासंदर्भामध्ये सरकारने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले असल्याची माहितीही त्यांनी दिली. सिक्कीम विद्यापीठाच्या परिसरामध्ये यंगयांग येथे एक कायमस्वरूपी मध्यवर्ती विद्यापीठ स्थापनेला केंद्राने मान्यता दिली आहे. यासाठी सुमारे 986.47 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सिक्कीम सरकारने विद्यापीठासाठी 300 एकर भूमी दिली आहे. या जमिनीचे मूल्य 15 कोटी आहे. त्यापैकी 265.94 एकर जमीन यापूर्वीच विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. उर्वरित जमिनीच्या हस्तांतराचे काम सध्या सुरू आहे.

देशामध्ये अरूणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, दिल्ली आणि पुडुचेरी इत्यादी ठिकाणी स्थापन करण्यात येणा-या  सहा एनआयटींसाठी सुधारित अंदाजपत्रकानुसार खर्चाला मान्यता देण्यात आली असल्याचे मंत्री पोखरियाल यांनी यावेळी सांगितले. यानुसार आता या एनआयटींसाठी 4371.90 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या सर्व एनआयटींचे  कामकाज 31 मार्च, 2022 च्या आत पूर्ण करण्यात येणार आहे. परिसर बांधणीचे काम पूर्ण झाल्यानंतर या संस्था आपआपल्या कायमस्वरूपी वास्तुंमध्ये पूर्ण क्षमतेने कार्यरत होतील. या एनआयटींमधून एकूण 6320 विद्यार्थ्‍यांना शिक्षण घेता येणार आहे.

****

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1627052) Visitor Counter : 269