पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबू धाबीचे युवराज यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद
Posted On:
25 MAY 2020 9:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मे 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबूधाबीचे युवराज शेख महमद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत युएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीचे सरकार आणि जनतेला ईद उल फित्रच्या शुभेच्छा दिल्या.
कोविड-19 महामारीच्या परिस्थितीत दोन्ही देशादरम्यानच्या प्रभावी सहकार्याबद्दल या नेत्यांनी समाधान व्यक्त केले. युएई मधल्या भारतीय नागरिकांना सहाय्य देत असल्याबद्दल पंतप्रधानांनी युवराजांचे आभार मानले.
युवराज,राजघराणे आणि युएई तल्या जनतेच्या उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.
* * *
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1626839)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam