आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची ताजी स्थिती-1


रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 41.57% पर्यंत पोहोचले

Posted On: 25 MAY 2020 7:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 मे 2020

 

कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या सोबत भारत सरकार श्रेणीबद्ध, पूर्व नियोजित आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून अनेक पावले उचलत आहे. उच्च स्तरावर याविषयी नियमितपणे पुनरावलोकन आणि परीक्षण केले जात आहे.

आतापर्यंत एकूण 57,720 लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 3,280 रुग्ण बरे झाल्याचे आढळून आले आहे. रुग्ण बरे होण्याचे एकूण प्रमाण 41.57% आहे. पुष्टी झालेल्या प्रकरणांची एकूण संख्या आता 1,38,845 आहे. सक्रिय वैद्यकीय पर्यवेक्षणाखाली असलेल्या प्रकरणांची संख्या 77,103 आहे.

कोविड-19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/  आणि @MOHFW_INDIA

कोविड-19शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva  यावर पाठवू शकता.

कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड-19 वरील राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf यावर उपलब्ध आहे.

 

* * *

M.Chopade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1626771) Visitor Counter : 287