रेल्वे मंत्रालय

24 मे 2020 रोजी सकाळी दहापर्यंत भारतीय रेल्वेच्या 2813 श्रमिक गाड्यांनी, 37 लाख प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थानी पोहचवले

Posted On: 24 MAY 2020 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मे 2020

भारतीय रेल्वेच्या 2813 श्रमिक विशेष रेल्वे गाड्या 24-05-2020 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत 37 लाखाहून अधिक प्रवाशांना घेऊन धावल्या, जवळपास 60 टक्के रेल्वे गाड्या गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाब येथून निघून मुख्यतः उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी  रवाना झाल्या आहेत. एकूण रेल्वे गाड्यांच्या 80 टक्के श्रमिक विशेष गाड्या उत्तर प्रदेश आणि बिहार मधील (उत्तरप्रदेशसाठी 1301 आणि बिहारसाठी 973) गन्तव्य स्थानांसाठी नियोजित करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील बरीच गन्तव्य स्थानके लखनऊ – गोरखपूर सेक्टर आणि बिहारमधील  पटणाच्या सभोवतालची  आहेत. कालपासून सुरू असलेल्या 565 रेल्वे गाड्यांपैकी 266 रेल्वे बिहार आणि 172 उत्तरप्रदेशकडे जात आहेत.

या मार्गावर वळविण्यात आलेल्या गाड्यांमुळे रेल्वेमार्गाच्या जाळ्यामध्ये गर्दी वाढली. आरोग्य विषयक विविध तपसण्यांची खबरदारी आणि सामाजिक अंतराचे नियम पाळतांना लागणारी खबरदारी यामुळे स्थानकांवर गर्दी होत आहे.

गर्दी कमी करण्यासाठी काही रेल्वेगाड्या मथुरा, झारसुगुडा मार्गे वळविण्यात आल्या. तसेच जड वाहतुकीसह मार्गांवर गर्दी होऊ नये म्हणून मार्गांच्या सुसूत्रीकरणाचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे गाड्यांचा विलंब टाळण्यासाठी रेल्वे बोर्ड पातळीवर, झोनल पातळीवर आणि विभागीय स्तरावर

दिवसरात्र देखरेख ठेवली जात आहे. श्रमिक विशेष गाड्या वेळेवर धाव्यावात यासाठी रेल्वे कर्मचारी देखील संवेदनशीलपणे काम करीत आहेत. या प्रयत्नांमुळे गर्दीची परिस्थिती बरीचशी कमी झाली आहे आणि गाड्यांची गतीशीलता बरीच सुधारली आहे.

पूर्वेकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये वाढ झाल्यामुळे येथील रेल्वेच्या जाळ्यात वाढ झाली आहे. परिणामी, रेल्वे गाड्यांना उशीर होऊन त्याचा परिणाम अन्न वाटपाच्या वेळापत्रकावर झाला आहे. श्रमिक विशेष गाड्यांना नियमित जेवण आणि पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आयआरसीटीसी आणि रेल्वेने संसाधनांना गतिशीलता दिली आहे.

 

B.Gokhale/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626614) Visitor Counter : 261