उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींकडून ईद-उल-फित्र च्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
24 MAY 2020 7:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मे 2020
देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी ईद-उल-फित्र पावन पर्वाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद हा कुटुंबं आणि समुदाय एकत्र येण्याचा प्रसंग असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना यावेळी सुरक्षिततेचे शारीरिक अंतर नियम पाळण्याची विनंती केली.
संपूर्ण संदेश खालीलप्रमाणे-
“ईद-उल-फित्रच्या शुभ मुहूर्तावर मी आपल्या देशातील लोकांना हार्दिक शुभेच्छा देतो.
ईद-उल-फित्र हा पारंपरिकपणे रमजानच्या पवित्र महिन्याचा शेवट आणि इस्लामिक कॅलेंडरचा दहावा महिना शव्वाल सुरू होण्याचा उत्सव आहे.
हा सण आपल्या समाजातील करुणा, दानधर्म आणि उदारपणाची भावना मजबूत करतो. कुटुंब आणि समाज एकत्र येण्याचा हा उत्सव आहे.
तथापि, यावर्षी, भारतात आणि जगात कोविड -19 च्या प्रसाराविरोधात अखंड लढा सुरू असल्याने, आपण जवळजवळ सर्व पारंपारिक सण घरी साजरे करीत आहोत.
म्हणूनच, आपण शांततेने उत्सव साजरा करण्यात समाधान मानून शारीरिक अंतर आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या सुरक्षा निकषांचे पालन केले पाहिजे. तथापि, मला आशा आहे की आपण सर्वजण आनंद, करुणा आणि एकोपा टिकवून हा उत्सव साजरा करू.
ईद-उल-फित्रशी संबंधित उदात्त आदर्शांनी आपल्या आयुष्यात आरोग्य, शांती, समृद्धी आणि सुसंवाद निर्माण होईल.”
S.Thakur/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1626609)
आगंतुक पटल : 291