PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
23 MAY 2020 9:09PM by PIB Mumbai
Delhi-Mumbai, May 23, 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्याशी, सध्याची कोविड-19 महामारी आणि या महामारीचे प्रदेशातल्या आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर होणारे संभाव्य परिणाम याबाबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली. या महामारीचा परिणाम कमी करण्यासाठी भारत, शक्य ती सर्व मदत श्रीलंकेला पुरवतच राहील असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. अम्फान या चक्रीवादळामुळे भारतात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान जगन्नाथ यांनी शोकभावना व्यक्त केली. कोविड-19 महामारीला तोंड देण्यासाठी मॉरिशस च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीच्या उद्देशाने 14 सदस्यांचे वैद्यकीय पथक आणि औषधांचा साठा घेऊन ‘ऑपरेशन सागर’ अंतर्गत भारतीय नौदलाचे ‘केसरी’ हे जहाज पाठवल्याबद्दल मॉरिशसच्या पंतप्रधनांनी आभार मानले.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
आरोग्य मंत्रालय सचिव आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आज covid-19 चा प्रादुर्भाव असलेल्या 11 महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली यामध्ये नगर विकास सचिव, प्रधान आरोग्य सचिव, महापालिका आयुक्त हेदेखील सहभागी होते, यावेळी असे नमूद करण्यात आले की केस दुपटीचा कमी काळ, जास्त मृत्युदर ही आव्हाने वरील महानगरपालिकांसमोर आहेत. यावेळी असे ठरविण्यात आले की या महानगरपालिकांमध्ये टेस्टिंग वाढवण्याची गरज आहे. आजवर 51,783 लोक बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासात 3,250 रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 41.39 टक्के झाली आहे. तर एकूण कन्फर्म केसची संख्या 1,25,101 झाली आहे. कालपासून 6,654 नवीन केसेस नोंद झाल्या.
इतर अपडेट्स:
- जेईई तसेच नीट आणि इतर स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अभ्यासाची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने स्पर्धा परीक्षांच्या सरावासाठी तयार केलेले राष्ट्रीय चाचणी अभ्यास अॅप अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झाले आहे अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल “निशंक” यांनी गुरुवारी दिली. या अॅपची सुविधा सुरु केल्यानंतर पहिल्या 72 तासांपेक्षा कमी कालावधीत 2 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हे अॅप डाऊनलोड केले असे त्यांनी सांगितले.
- देश कोविड -19 महामारीविरोधात लढा देत असताना या महत्त्वपूर्ण काळात संकटग्रस्तांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणतीही कसर सोडली नाही. परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात परत जाता यावे म्हणून रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारच्या गरजेनुसार पुढील दहा दिवसांत आणखी 2600 श्रमिक विशेष गाड्या चालविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा अडकलेल्या सुमारे 36 लाख स्थलांतरितांना होण्याची अपेक्षा आहे. गेल्या 23 दिवसांत भारतीय रेल्वेने 2600 श्रमिक विशेष गाड्या चालविल्या आहेत.आत्तापर्यंत सुमारे 36 लाख अडकलेल्या स्थलांतरितांना त्यांच्या राज्यात पोहचविले आहे.
- भारतीय रेल्वे सध्या 12 मे 2020 पासून विशेष रेल्वे गाड्यांच्या 15 जोड्या चालवीत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी 15 जोड्यांच्या या विशेष रेल्वे गाड्यांच्या नियम आणि अटींमध्ये खालीलप्रमाणे काही सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्यांचा अगाऊ आरक्षण कालावधी (एआरपी) 7 दिवसांवरून वाढवून आता 30 दिवस करण्यात येणार आहे. या गाड्यांसाठी तात्काळ बुकिंग नसेल.
- विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत स्वायत्तपणे कार्यरत असलेल्या बंगळूरू येथील 'सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्स' (सीईएनएस) या संशोधन संस्थेने कपाच्या आकारात मास्कचे डिझाईन विकसित केले आहे. या डिझाईनचे बौद्धिक स्वामित्व घेण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या नव्या डिझाईनच्या मास्कमुळे बोलताना तोंडाच्या पुढच्या बाजूला पुरेशी जागा उपलब्ध होते. नव्या डिझाईनच्या मास्कचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी बंगळूरूस्थित एका कंपनीकडे हे काम देण्यात आले आहे.
- "हुनर हाट" मधे सुरक्षित अंतर राखणे, स्वच्छता, निर्जंतुकीकरण, मास्क आदी आवश्यक साधनांची विशेष व्यवस्था केली जाणार आहे. कोरोना आव्हानाच्या पार्श्वभूमीवर सुमारे पाच महिन्यांनंतर हस्त - शिल्प कारागिरांच्या सक्षमीकरणासाठी "हुनर हाट" महोत्सव सप्टेंबर 2020 पासून पुन्हा सुरु होतोय. तो ही पहिल्यापेक्षा अधिक सक्षमतेने. यात कारागिरांचा अधिक सहभाग राहाणार असून यंदाची संकल्पना आहे "स्थानिक ते वैश्विक".
- अजमेर महानगरपालिकेने (एएमसी) 2 मार्च 2020 पासून सक्रीय उपाययोजना राबवायला सुरुवात केली होती, आणि त्यानंतर 11 मार्च 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने नवीन कोरोना विषाणू (कोविड-19) ला जागतिक महामारी जाहीर केल्यानंतर कडक उपाययोजना जारी केल्या. एएमसी ने नगर निगम येथे कोविड-19 युद्ध कक्ष स्थापन केला असून कोविड-19 च्या सद्यस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी पुढील कारवाई करण्याच्या दिशेने अजमेरचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय आणि पोलीस अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्य केले जाते. डब्ल्यूएचओ आणि एमएचए ने कोविड-19 जारी केलेल्या सावधगिरीच्या उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण धोरणांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यामध्ये हा युद्ध कक्ष महत्वाची भूमिका बजावतो:
- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) रोगप्रतिकार शक्ती वाढवणे तसेच विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी एचआयव्ही वरील औषधांऐवजी hydroxychloroquine (HCQ) वापरण्याचे ठरवले आहे. सुधारीत नियमावलीत हा बदल केला जात आहे. शिवाय कांगारा चहा मधील रसायनेही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात व कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यात एचआयव्ही वरील औषधांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे निरिक्षण संस्थेने नोंदवले आहे.
- केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, कोविडनंतर भारत अधिक आत्मविश्वासाने उदयाला येईल आणि जगात प्रतिष्ठा मिळवेल. एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, या संकट काळात सर्व भीती आणि अपेक्षा असूनही आपल्याला विश्वास आहे की आजपासून सहा महिन्यांनंतर जग भारताकडे आदराने पाहील आणि आपल्याबरोबर सहकार्य करायला उत्सुक असेल.
महाराष्ट्र अपडेट्स
- वंदे भारत अभियान अंतर्गत मुंबई विमानतळावर 17 विमानांतून 2 हजार 423 भारतीय नागरिक काल (दिनांक 22 मे 2020) पर्यंत विदेशातून परतले आहेत. यापैकी 906 प्रवासी हे मुंबईतील रहिवासी आहेत तर उर्वरित महाराष्ट्रातील 1 हजार 139 आणि इतर राज्यातील 378 प्रवासी आहेत. दरम्यान, परतलेल्या नागरिकांपैकी मुंबईतील विविध 43 हॉटेल्स्मध्ये मिळून सुमारे 1 हजार 128 नागरिकांना अलगीकरण व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे.
- राज्यामध्ये 2940 कोविड-19 केसेस नोंद झाल्या. त्यामुळे राज्याची रुग्ण संख्या 44,582 झाली आहे. मुंबई या हॉटस्पॉट मध्ये 1,751 नवीन केसेस नोंद झाल्या. 63 मृत्यूसह राज्यातील एकूण मृत्यू संख्या 1,517 झाली आहे. त्यात आज मुंबईतील 27 जणांचा समावेश आहे.
PIB FACTCHECK


***
RT/MC/SP/DR
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1626472)
Visitor Counter : 440
Read this release in:
English
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam