पंतप्रधान कार्यालय

पाकिस्तानमध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 22 MAY 2020 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 मे 2020

                                     

पाकिस्तानमध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पाकिस्तानी नागरिकांप्रति पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

"पकिस्तानमध्ये विमान अपघात होऊन त्यात प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने अत्यंत दुःख झाले आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती मी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी व्यक्तींना लवकरात लवकर बरे वाटावे अशी सदिच्छा व्यक्त करतो.” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हंटले आहे.

 

 

* * *

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626249) Visitor Counter : 135