रेल्वे मंत्रालय

रेल्वेने आरक्षण खिडक्या पुन्हा सुरु करण्यासाठी, सामायिक सेवा केंद्र आणि एजंट यांच्यामार्फत आरक्षणाला दाखवला हिरवा कंदील


आरक्षण केंद्र सुरु करणे, हे रेल्वे प्रवासी सेवा श्रेणीबद्ध रीतीने पूर्ववत होण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल

Posted On: 21 MAY 2020 11:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मे 2020


भारतीय रेल्वे, तिकिटे आरक्षित करण्यासाठीच्या आरक्षण खिडक्या येणाऱ्या काळात टप्याटप्याने सुरु करणार आहे.

स्थानिक गरजा व स्थिती लक्षात घेऊन आरक्षण खिडक्या सुरू करण्याबाबत निर्णय घेणे तसेच ते अधिसूचित करण्याच्या सूचना विभागीय रेल्वेला देण्यात आल्या आहेत. या आरक्षण खिडक्या उद्यापासून (22 मे 2020) टप्याटप्याने सुरु करण्यात येतील. त्याबरोबरच स्थानिक आवश्यकता व स्थिती लक्षात घेऊन या केंद्रांच्या वेळा, त्यांचे ठिकाण याबाबतची माहिती देखील प्रसारीत करण्यात येणार आहे.

रेल्वेने उद्यापासून (22 मे 2020) ‘कॉमन सर्विस सेंटर’ अर्थात सामायिक सेवा केंद्र आणि एजंटामार्फतही तिकिटे आरक्षित करण्याला परवानगी दिली आहे. 

सध्याच्या नियमांना अनुसरून श्रमिक विशेष रेल्वे गाड्या चालवणे देखील स्थानिक राज्य सरकारद्वारा सुरु राहील, असे नमूद करण्यात येत आहे.

आरक्षण सुविधा सुरु करणे, हे रेल्वे प्रवासी सेवा श्रेणीबद्ध रीतीने पूर्ववत करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल असून आरक्षित गाड्यात भारताच्या सर्व भागातून संभाव्य प्रवाश्यांना, तिकीट आरक्षित करणे सुलभ होणार आहे. 

कोविड-19 महामारी लक्षात घेता विभागीय रेल्वे शारीरिक अंतराबाबत मार्गदर्शक तत्वे व स्वच्छतेबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करेल.


* * *

S.Pophale/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626030) Visitor Counter : 187