शिक्षण मंत्रालय

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शिक्षण क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक उपक्रमांची केली घोषणा


मानवी भांडवल गुंतवणूक ही देशाच्या उत्पादकता आणि समृद्धीची गुंतवणूक-निर्मला सीतारमण

“एक राष्ट्र, एक डिजिटल प्लॅटफॉर्म” आणि “एक वर्ग एक वाहिनी” देशाच्या दूरदूरच्या कानाकोपर्‍यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहचविण्याचे सुनिश्चित करेल- मनुष्य बळ विकास मंत्री

Posted On: 18 MAY 2020 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18  मे 2020

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी  शिक्षण क्षेत्राला चालना देण्यासाठी 17 मे रोजी नवी दिल्ली येथे अनेक उपक्रमांची घोषणा केली. त्या म्हणाल्या की मानवी भांडवलात गुंतवणूक ही देशाच्या उत्पादकतेत आणि समृद्धीत  गुंतवणूक करण्यासारखे आहे. सध्याच्या साथीच्या परिस्थितीने आपल्या शिक्षण व्यवस्थेसाठी नवी आव्हाने आणि अनेक संधी सादर केल्या आहेत.

अनेक योजना  विशेषत: अभिनव अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र स्वीकारणे, त्रुटी असलेल्या क्षेत्रात अधिक लक्ष देणे , प्रत्येक टप्प्यावर अधिक समावेशक आणि तंत्रज्ञानाचे एकत्रिकरण करून मानवी भांडवलावर  केंद्रित गुंतवणूकीच्या नव्या युगात प्रवेश करण्यासाठी या संधीचा लाभ उठवत  शिक्षण क्षेत्राने अनेक योजना आखल्या असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 

देशातील दुर्गम भागात अगदी शिक्षणाच्या सर्व स्तरांवर आणि सर्व भौगोलिक ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेण्याच्या दृष्टीने सरकार सर्वांना समानतेसह शिक्षण सुनिश्चित करण्यास वचनबद्ध असल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या . 

शिक्षण क्षेत्राला प्राधान्य दिल्याबद्दल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री  रमेश पोखरियाल निशंक’ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  आभार मानले आहेत. या उपक्रमांबद्दल त्यांनी  केंद्रीय अर्थमंत्र्यांचे देखील आभार मानले आणि आशा व्यक्त केली की यामुळे शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन घडून येईल आणि देशातील विद्यार्थ्यांचा समग्र विकास घडवून आणतील.

पोखरियाल म्हणाले की, एक राष्ट्र, एक डिजिटल प्लॅटफॉर्म आणि एक वर्ग एक वाहिनी हे सुनिश्चित करेल की दर्जेदार शैक्षणिक साहित्य देशातील दूरदूरच्या भागात असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. ते म्हणाले की या उपक्रमांमुळे शिक्षणामध्ये सुगमता आणि समानता वाढीस लागेल आणि आगामी काळात एकूण शाळांमधील नोंदणी गुणोत्तरात सुधारणा होईल. ते म्हणाले की, दिव्यांग मुलांकडेही योग्य लक्ष दिले जात आहे आणि या उपाययोजना नवीन भारत निर्मितीत एक नवीन उदाहरण स्थापित करतील.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या दिशेने त्वरित पुढाकार घेण्याची घोषणा केली: यामध्ये-

  1. पीएम ई-विद्या नावाचा एक व्यापक उपक्रम सुरू केला जाईल ज्यायोगे डिजिटल / ऑनलाईन / ऑन-एअर  शिक्षणाशी संबंधित सर्व प्रयत्न एकत्र केले जातील.यामुळे शिक्षणाला मल्टी-मोड प्रवेश सक्षम होईल आणि यात - दीक्षा (एक राष्ट्र-एक डिजिटल प्लॅटफॉर्म) जी आता सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना शालेय शिक्षणामध्ये गुणवत्तापूर्ण ई-सामग्री प्रदान करण्यासाठी देशाचे डिजिटल पायाभूत सुविधा बनेल; टीव्ही (एक वर्ग एक वाहिनी ) जिथे इयत्ता  1 ते 12 वीच्या प्रत्येक ग्रेडसाठी एक  समर्पित वाहिनी  दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देईल. शालेय आणि उच्च शिक्षणासाठी एमओओसीएस स्वरूपातील स्वयंम ऑनलाइन अभ्यासक्रम; आयआयटीजेईई  / एनईईटी तयारीसाठी आयआयटीपीएएल, कम्युनिटी रेडिओ आणि सीबीएसई शिक्षा वाणी पॉडकास्टद्वारे प्रसारित; आणि डिजिटली अक्सेसीबल इन्फॉरमेशन सिस्टम (डीएआयएसवाय)  आणि एनआयओएस वेबसाइट / यूट्यूबवर साइन लँग्वेजमध्ये विकलांगांसाठी विकसित केलेले अभ्यास साहित्य यांचा समावेश आहे. याचा फायदा देशभरातील जवळपास 25 कोटी शाळकरी मुलांना होणार आहे.
  2. जागतिक महामारीच्या या काळात, आपण  विद्यार्थी, शिक्षक आणि कुटूंबियांना मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी मनोवैज्ञानिक आधार प्रदान करणे आवश्यक आहे. वेबसाइट, टोल-फ्री हेल्पलाइन, समुपदेशकांची राष्ट्रीय डिरेक्टरी , परस्पर संवादाच्या माध्यमातून अशा प्रकारची मदत पुरवण्यासाठी मनोदर्पण उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमामुळे देशातील सर्व शाळेत जाणाऱ्या मुलांसह त्यांचे पालक, शिक्षक आणि इतरांना फायदा होईल.
  3. मुक्त, दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण नियामक चौकटीचे उदारीकरण करून सरकार उच्च शिक्षणात ई-शिक्षणाचा विस्तार करत आहे. अव्वल 100 विद्यापीठे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करतील. तसेच, पारंपारिक विद्यापीठे आणि ओडीएल कार्यक्रमांमधील ऑनलाइन घटक देखील सध्याच्या 20% वरून 40% पर्यंत वाढविले जातील. यामुळे विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील सुमारे 7 कोटी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाढीव संधी उपलब्ध होतील.
  4. शिकण्यावर लक्ष केंद्रित करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अनुभवात्मक आणि आनंददायक शिक्षणासह, महत्वपूर्ण  विचारशैली, सर्जनशील आणि संप्रेषण कौशल्यांना  चालना देण्याची आवश्यकता आहे. अभ्यासक्रम भारतीय नीतिमूल्यात रुजलेला असणे  आणि जागतिक कौशल्य आवश्यकतांसह एकत्रीकरण आवश्यक आहे.  म्हणूनच शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण आणि बालपणातील प्रारंभिक अवस्थेसाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि रूपरेषा  तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्यायोगे विद्यार्थी आणि भविष्यातील शिक्षकांना जागतिक मापदंडांनुसार तयार केले जाईल.
  5. राष्ट्रीय मूलभूत साक्षरता आणि संख्या अभियान सुरू केले जाईल, जेणेकरून देशातील प्रत्येक मुलाने 202 पर्यंत ग्रेड तीन मध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्या ओळख प्राप्त करायला हवे. यासाठी शिक्षकांची क्षमता वाढवणे, एक मजबूत अभ्यासक्रमांची चौकट, शिक्षण सामग्री - ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही, शिकण्याचे निष्कर्ष आणि त्यांचे मोजमाप निर्देशांक, मूल्यांकन तंत्र, शिकण्याच्या प्रगतीचा मागोवा इ. रचना केली जाईल . हे अभियान 3 ते 11 वयोगटातील सुमारे 4 कोटी मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करेल.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1624915) Visitor Counter : 328