संरक्षण मंत्रालय
समुद्र सेतू अभियानाच्या दुस-या टप्प्यात आयएनएस जलाश्वने 588 भारतीयांना मालदीवमधून आणले
Posted On:
17 MAY 2020 6:51PM by PIB Mumbai
भारतीय नागरिकांना परदेशातून सागरी मार्गाने आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस जलाश्व नौकेचा समुद्र सेतू अभियानासाठी वापर करण्यात येत आहे. या अभियानाच्या दुस-या टप्प्यात आज सकाळी कोची बंदरावर 588 भारतीयांना आणण्यात आले. मालदीवमधल्या माले बंदरातून भारतीयांना घेवून ही नौका आज मायदेशी आली. 588 भारतीयांपैकी या नौकेमध्ये 70 महिला (त्यापैकी 6 गर्भवती आहेत) आणि 21 मुलांचा समावेश आहे. कोची बंदरातल्या सागरी क्रुझ टर्मिनलवर ही नौका आली.
D83G.jpeg)
यावेळी आयएनएस जलाश्व, कोचीन पोर्ट ट्रस्ट आणि भारतीय नौदलाचे अधिकारी, जवान तसेच राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. बंदर प्राधिकरणाच्यावतीने सर्व प्रवाशांची तपासणी करून इमिग्रेशनची प्रक्रिया सुलभतेने पार पाडली. तसेच बाहेरून आलेल्या या भारतीयांना त्यांच्या जिल्ह्यात किंवा राज्यात पाठवून तसेच तिथे त्यांना विलगीकरणामध्ये ठेवणे आवश्यक असल्याचे लक्षात घेवून त्याप्रमाणे पुढील व्यवस्था करण्यात आली.
कोविड-19 महामारीचा प्रसार लक्षात घेवून ज्या भारतीयांना मायदेशी परतायचे आहे, त्यांच्यासाठी सरकारने समुद्र सेतू अभियान सुरू केले आहे. खराब हवामान आणि जोरदार पाऊस, वादळ यामुळे जलाश्वचा परतीचा प्रवास 15 मे रोजी सुरू होवू शकला नाही. एक दिवस विलंबाने म्हणजे 16 मे 2020 रोजी मालेतून ही नौका निघाली होती.
G.Chippalkatti/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1624727)
Visitor Counter : 231
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam