विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
कोविड -19 चा सामना करण्यासाठी वैज्ञानिकांनी विकसित केले मोबाइल इनडोअर निर्जंतुकीकरण स्प्रेयर
हे स्प्रेयर्स लपलेल्या क्षेत्रात पोहोचण्यासाठी आणि व्यापक प्रमाणात स्वच्छता करण्यासाठी मॉपिंग वैशिष्ट्ये आणि लांबी वाढवता येण्याजोग्या उपकरणांनी सुसज्ज आहेत
हे तंत्रज्ञान सध्याच्या कोविड -19 संकटाच्या नंतरही प्रासंगिक असेल
Posted On:
16 MAY 2020 11:57AM by PIB Mumbai
दुर्गापूर येथील सीएसआयआर-सेंट्रल मेकॅनिकल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (सीएमईआरआय) च्या वैज्ञानिकांनी दोन मोबाइल इनडोअर डिसइन्फेक्शन स्प्रेयर युनिट विकसित केले आहेत. याचा वापर रोगकारक सूक्ष्म जिवाणू प्रभावीपणे साफ करण्यासाठी आणि निर्जंतुकीकरणासाठी विशेषत: रुग्णालयात केला जाऊ शकतो.
बॅटरी पावर्ड डिसइन्फेक्टंट स्प्रेयर (बीपीडीएस) आणि न्यूमॅटिक ऑपरेटेड मोबाईल इनडोर डिसइन्फेक्शन (पीओएमआयडी)या युनिट्सचा वापर टेबल, डोअरनॉब ,लाईट स्विचेस ,काउंटरटॉप, हँडल्स, डेस्क, फोन, कीबोर्ड, टॉयलेट्स सारख्या वारंवार स्पर्श केलेले पृष्ठभाग स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी केला जाऊ शकतो. या जंतुनाशक युनिट्सचा अधूनमधून वापर केल्यामुळे अशा पृष्ठभागाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांमध्ये कोरोना विषाणू संक्रमित होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.
बीपीडीएस आणि पीओएमआयडी या दोन्हीमधील स्प्रेअर सिस्टमची रचना दोन-टप्प्यातील फवारणी युनिट्स आणि खालच्या आणि वरच्या स्तरात बसवलेल्या लवचिक नोजल्सच्या सहाय्याने घरातील अंतर्गत भाग स्वच्छ आणि निर्जंतुकीकरणासाठी स्वतंत्र स्टोरेज टाक्यांसह केली आहे. अवजड वापरासाठी आणि मोठ्या भागासाठी जंतुनाशक फवारणीचा औद्योगिक प्रकार देखील आहे.
पीओएमआयडी मोबाइल इनडोअर जंतुनाशक युनिट चार चाकांवर बसविलेल्या स्टील फ्रेमद्वारे बनविले आहे. या प्रणालीमध्ये कॉम्प्रेसर, पाईपिंग आणि फिटिंग्ज आणि स्प्रे नोजल आहेत. हातात धरता येणारे लवचिक स्प्रे आर्म आवश्यकतेनुसार कोणत्याही दिशेने वापरले जाऊ शकते. पीओएमआयडी युनिटमध्ये 10 लिटर क्षमतेसह प्रत्येकी दोन स्टोरेज टाक्या आहेत. बीपीडीएस युनिट एक कॉर्डलेस मशीन आहे ज्यामध्ये दोन-नोजल स्प्रे सिस्टम आणि विस्तारित आर्म स्प्रे युनिट आहे. त्यात 20 लीटरची स्टोरेज क्षमता आहे आणि एकाच चार्जमध्ये बॅटरीचा 4 तासांचा बॅकअप आहे. सिस्टमचे एकूण वजन (रिक्त टाकी) 25 किलो आहे.
सीएसआयआर-सीएमईआरआयचे संचालक प्रा . हरीश हिरानी म्हणाले की “बाजारात प्रचलित बहुतेक जंतुनाशक फवारण्या एकतर चेंबर स्टोरेजमध्ये साफसफाई किंवा निर्जंतुकीकरणावर आधारित असतात आणि त्या पंप-आधारित असतात. पंप स्प्रेयरद्वारे निर्मित थेंब आकाराने बरेच मोठे असतात आणि पृष्ठभाग कमी असतो. मात्र सीएसआयआर-सीएमईआरआय विकसित इनडोअर स्प्रेयर सिस्टममध्ये जंतुनाशक आणि साफसफाईसाठी ड्युअल-चेंबर स्टोरेज असते आणि त्यामध्ये नोझल डिझाइन, नोजल्सची चांगली व्यवस्था असते आणि ड्रॉपलेटचा आकार कमी असतो. फवारणी केलेले जंतुनाशक विशिष्ट प्रकारच्या द्रव्याने पृष्ठभागाचे अधिक क्षेत्र व्यापू शकेल."
“फवारलेल्या जंतुनाशकांचा प्रभाव ठरवण्यासाठी कणांचा आकार आणि जंतुनाशकांच्या कणांची संख्या हे दोन महत्त्वपूर्ण निकष आहेत. सीएसआयआर-सीएमईआरआय कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी कार्यक्षम आणि प्रभावी तंत्रज्ञान विकसित करण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे. प्रा. हिरानी म्हणाले कि उपकरणांच्या विकासाचा पुढील टप्पा म्हणजे जंतुनाशक आणि साफसफाई करण्यासाठी-360० डिग्री कव्हरेज समाविष्ट करणे तसेच ते शाळा आणि घरांमध्ये वापरण्यासाठी सुलभ आणि स्वायत्त बनविणे हा आहे.
हे स्प्रेयर्स लपलेल्या क्षेत्रात पोहोचण्यासाठी आणि व्यापक प्रमाणात स्वच्छता करण्यासाठी मोपिंग वैशिष्ट्ये आणि लांबी वाढवता येण्याजोग्या उपकरणांनी सुसज्ज आहेत. सध्याच्या कोविड-19 संकटाच्या नंतरही ते प्रासंगिक असेल, कारण विषाणू सर्वत्र अस्तित्त्वात आहेत आणि दरवर्षी जगभरात अशा प्रकारच्या इन्फ्लूएंझाच्या अनेक घटना मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. म्हणूनच, डॉ. हिराणी यांनी देशातील एमएसएमईंना भविष्यात स्वच्छता आणि आरोग्य साधनांचा कल लक्षात घेऊन या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. बीपीडीएससाठीचे तंत्रज्ञान पॉवर टेक मायनिंग प्रा. लि.कडे वाणिज्यिक उद्देशासाठी हस्तांतरित केले.
M.Jaitly/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1624638)
Visitor Counter : 294
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada