गृह मंत्रालय
स्थलांतरित मजुरांचा राज्या-राज्यामधून प्रवास सुरळीत व्हावा यासाठी एनडीएमएने विकसित केली राष्ट्रीय स्थलांतरित विषयक माहिती यंत्रणा
स्थलांतरित मजुरांच्या प्रवासाविषयी माहिती ठेवण्यासाठी आणि राज्या -राज्यातल्या उत्तम सहकार्यासाठी याचा वापर करण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाचे राज्यांना पत्र
Posted On:
16 MAY 2020 9:05PM by PIB Mumbai
स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतता यावे यासाठी त्यांना बस गाड्या आणि श्रमिक विशेष रेल्वे द्वारे प्रवास करण्याची केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या मजुरांच्या प्रवासा बाबत माहिती आणि अडकलेल्या व्यक्तींचा राज्या-राज्यातून प्रवास सुरळीत व्हावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने, राष्ट्रीय स्थलांतरित विषयक माहिती यंत्रणा हा ऑनलाईन डॅश बोर्ड विकसित केला आहे.
या ऑनलाईन पोर्टल वर स्थलांतरित मजुरांविषयी केंद्रीय स्तरावर माहिती कोष ठेवण्यात येणार असून या मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतण्याचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी आंतर- राज्य जलद संपर्क आणि समन्वय राखण्यासाठी मदत होणार आहे.याशिवाय संपर्कातल्या व्यक्ती शोधण्यासाठीही याची मदत होणार असून त्यामुळे कोविड-19 चा प्रसार रोखण्याच्या कामातही याचा उपयोग होऊ शकतो.
मजुराचे नाव, वय, मोबाईल क्रमांक, मूळ जिल्हा आणि प्रवासाची तारीख यासारखी माहिती राज्यांनी आधीच जमा केली असून ती अपलोड करण्यासाठी मजुरांच्या माहितीचे प्रमाणीकरण बनविण्यात येत आहे.राज्यातून कितीजण आणि कोठे निघाले आहेत आणि त्यांच्या मूळ राज्यात किती जण पोहोचले आहेत याबाबत राज्यांना अंदाज घेता येणार आहे.
कोविड-19 महामारी दरम्यान संपर्कातल्या व्यक्तींचा शोध आणि या मजुरांच्या प्रवास विषयक माहितीसाठी त्यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करता येणार आहे.
राज्यांशी केलेल्या संपर्काबाबत माहितीसाठी इथे क्लिक करा-
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1624635)
Visitor Counter : 294
Read this release in:
Hindi
,
Punjabi
,
English
,
Urdu
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada