नागरी उड्डाण मंत्रालय

वंदे भारत मिशन अंतर्गत 31 ये-जा करणाऱ्या हवाई उड्डाणांद्वारे 6,037 भारतीयांचे 7 मे 2020 पासून मायदेशी आगमन

Posted On: 12 MAY 2020 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  12 मे 2020

वंदे भारत मिशन अंतर्गत दिनांक 7 मे 2020 पासून आत्तापर्यंत एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या 31 हवाई उड्डाणांद्वारे 6,037 भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे.

दिनांक 7 मे 2020 पासून भारत सरकारने  परदेशातील भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन ही सर्वात मोठ्या मोहिमांपैकी एक मोहीम सुरू केली आहे. 

या मोहीमेअंतर्गत हवाई उड्डाण मंत्रालय, परदेश म़ंत्रालय आणि राज्य सरकार यांच्याशी समन्वय साधून भारतीयांना मायदेशी आणण्याचे कार्य करत आहे.

एअर इंडिया आणि तिची उपशाखा एअर इंडिया एक्प्रेस यांनी मिळून आपल्या एकूण 64 विमानफेऱ्यांद्वारे अमेरिका , इंग्लंड, बांगलादेश, सिंगापूर, सौदी, अरेबिया, कुवैत,फिलीपाईन्स, युएई आणि  मलेशिया अशा बारा देशांतून पहिल्या टप्प्यात 64 विमानफेऱ्या करून (42 एअर इंडियाच्या आणि 24 एअर इंडिया एक्स्प्रेस ) 14,800 भारतीयांना मायदेशी आणले आहे.

या मोठ्या स्थंलातर मोहीमेवेळी भारत सरकारने आणि डीजीसीएने घालून दिलेल्या सर्व संरक्षक आणि स्वच्छतेच्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्यात आला.

या संवेदनशील वैद्यकीय स्थलांतर मोहीमेवेळी हवाई उड्डाण मंत्रालय, एएआय, एअर इंडिया यांनी प्रवासी, हवाई कर्मचारी आणि विमानतळावरील इतर कर्मचारी यांच्या सुरक्षेत कोणतीही कसूर  ठेवली नाही.

सरकारच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे अत्यंत काटेकोर दक्षता यावेळी पाळण्यात आली.

 

M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1623386) Visitor Counter : 206