संरक्षण मंत्रालय

हवाई दल, नौदल, तटरक्षक दल आणि इतर सेवांच्या हवाई क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण

Posted On: 08 MAY 2020 9:12PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 मे 2020

 

भारतीय हवाईदल, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या 37 हवाई क्षेत्रांच्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी संरक्षण मंत्रालयाने आज मेसर्स टाटा पॉवर एसईडी सोबत सुमारे 1,200 कोटी रुपयांचा करार केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रस्तावाला विधिवत मान्यता दिली आहे.

हवाई क्षेत्रांच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण भाग-2 हा हवाई क्षेत्रांच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण भाग -1 कार्यक्रमाचा पाठपुरावा आहे ज्यात भारतीय हवाई दलाच्या 30 हवाई क्षेत्रांचे आधुनिकीकरण अंतर्भूत आहे. हवाई क्षेत्रांच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण भाग -1 अंतर्गत आधुनिकीकरण केलेल्या हवाई क्षेत्रांचा लष्करी आणि नागरी वापरकर्त्यांना प्रचंड फायदा झाला आहे.

हा प्रकल्प महत्वपूर्ण असून यात कॅट- II इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (आयएलएस) आणि कॅट II एअर फील्ड लाइटनिंग सिस्टम (एएफएलएस) इत्यादी आधुनिक हवाई क्षेत्र उपकरणांची स्थापना आणि कार्यान्वित करणे समाविष्ट आहे. हवाई क्षेत्राच्या आसपासची आधुनिक उपकरणे हवाई वाहतूक नियंत्रकाशी थेट जोडली जातील ज्याद्वारे हवाई वाहतूक नियंत्रकांना हवाई क्षेत्र यंत्रणेचे उत्कृष्ट नियंत्रण करता येईल. या प्रकल्पांतर्गत उपकरणांच्या आणि पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणामुळे दृश्यमानता कमी असताना किंवा प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत लष्करी आणि नागरी विमानांच्या उड्डाणात सुलभता वाढविण्यास मदत होईल.

या करारामुळे सध्याच्या परिस्थितीत देशांतर्गत उद्योगाला चालना मिळेल. या प्रकल्पातून 250 हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत सामील होण्याचा थेट  फायदा होईल. हा करार बाजारपेठेत आवश्यक खेळते भांडवल आणण्यास मदत करेल तसेच नागरी आणि विद्युत उपकरणे व बांधकाम वगळता संप्रेषण, हवाई क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक प्रणाली, माहिती तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात रोजगार निर्मितीला चालना देईल.

***

B.Gokhale/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1622291) Visitor Counter : 167