आदिवासी विकास मंत्रालय
आदिवासी कल्याण मंत्रालय आणि आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था मिळून गरजू आदिवासी कारागिरांना मोफत धान्य सामुग्री उपलब्ध करणार
प्रविष्टि तिथि:
08 MAY 2020 8:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मे 2020
आदिवासी कल्याण मंत्रालयाअंतर्गत ट्रायफेड आणि आर्ट आँफ लिव्हिंग संस्था (AOL)या दोघांमध्ये सामंजस्य करार झाला असून या दोन्ही संस्था आपापल्या संस्थेतर्फे आदिवासी उपक्रमांना चालना देणार आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने भारतीय गरजू आदिवासी कारागिरांना मोफत धान्य सामुग्री उपलब्ध करणार आहे.
ट्रायफेडच्या विभागीय कार्यालयाने अशी मोफत धान्य सामुग्री देण्यासाठी देशभरातील 9,409 गरजू आदिवासी कामगार निश्चित केले असून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या # स्टँन्ड विथ ह्यूमँनिटी कँम्पेनद्वारे त्यांना धान्य उपलब्ध केले जाईल. विविध राज्यातील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यालयांतून त्यांच्याशी संपर्क साधला जाईल.
क्रमांक विभागीय कार्यालय धान्य सामुग्री
1 अहमदाबाद 756
2 चंदिगड 191
3 भोपाळ 954
4 जयपूर 2707
5 कोलकाता 1576
6 मुंबई 817
7 रांची 2017
8 डेहराडून 391
एकूण 9409
याबाबत अद्ययावत तपशील 10 मे 2020 पासून उपलब्ध होईल.
M.Jaitly/S.Patgoankarr/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1622271)
आगंतुक पटल : 265
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam