सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

गडकरी यांनी कार्यक्रम व मनोरंजन व्यवस्थापन उद्योग आणि लघु वित्त उपक्रमांना सकारात्मक दृष्टीकोन बाळगून सद्य परिस्थितीत संधी शोधण्याचे केले आवाहन

Posted On: 08 MAY 2020 8:14PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 मे 2020

 

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग-एमएसएमई आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज कार्यक्रम व मनोरंजन व्यवस्थापन संघटनेचे प्रतिनिधी आणि वित्त उद्योग विकास परिषदेच्या सदस्यांसोबत कोविड-19 चा त्यांच्या क्षेत्रावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित केली होती.

 

 

 

चर्चे दरम्यान, प्रतिनिधींनी कोविड-19 साथीच्या आजारामुळे एमएसएमई सामना करत असलेल्या विविध आव्हानांसंबंधी चिंता व्यक्त केली तसेच काही सूचना देखील केल्या आणि या क्षेत्राचे कामकाज सुरळीत चालू राहण्यासाठी सरकारकडे पाठबळाची विनंती केली.

हे क्षेत्र उत्कृष्ट कार्य करत असून त्याचे कौशल्य आणि दृष्टीकोनाला व्यापक स्तरावर मान्यता प्राप्त आहे यावर गडकरी यांनी यावेळी जोर दिला. आपण कोरोनाविरूद्ध युद्ध करीत असताना त्यांनी कार्यक्रम व करमणूक क्षेत्रातील सदस्यांना यासंदर्भातील योजनांचा लाभ घेण्यासाठी स्वतःला एमएसएमई म्हणून नोंदणी करण्यास सांगितले.

या क्षेत्रातील उद्योगासाठी भारतात प्रचंड क्षमता आहे. भारत प्रगती मैदानाचे पुनर्निर्माण आंतराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र म्हणून करीत आहे. सर्व स्तरावरील उद्योगाला जास्तीत जास्त मदत करण्यास सरकार सज्ज आहे. गडकरींनी प्रतिनिधींना सविस्तर निवेदन सादर करण्यास सांगितले जे ते इतर मंत्रालय/विभागांकडे वर्ग करतील. या संकटातून बाहेर येण्यासाठी उद्योगांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.

मंत्र्यांनी सांगितले की जपान सरकारने आपल्या उद्योगांना चीनमधून जपानी गुंतवणूक काढून इतरत्र हलविण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे. ते म्हणाले की, भारतासाठी ही एक चांगली संधी असून त्याचा आपण लाभ उठविला पाहिजे.

या बैठकीत काही प्रमुख मुद्दय़ांवर प्रकाश टाकण्यात आला व एमएसएमई म्हणून नोंदणी करण्यासाठी कार्यक्रम व व्यवस्थापनासाठी प्रवर्गाची ओळख, एमएसएमईंसाठी राज्य / जिल्हा स्तरावर समर्पित अधिकाऱ्यांची गरज, संसाधन निधीतून लघु वित्त संस्थांना मदत, इत्यादी सूचनांवर चर्चा करण्यात आली. गडकरी यांनी प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

उद्योगांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा आणि कोविड-19 चे संकट संपल्यानंतर निर्माण होणाऱ्या संधीचे सोने करावे, यावर गडकरी यांनी जोर दिला.

*****

U.Ujgare/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1622244) Visitor Counter : 138