नागरी उड्डाण मंत्रालय

सरकारी संस्थाना GARUD पोर्टल द्वारे कोविड-19 शी संबंधित ड्रोन/आरपीएएस  कार्यान्वयनासाठी सशर्त सूट

Posted On: 05 MAY 2020 7:06PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 मे 2020

 

सरकारी संस्थाना कोविड-19 संबंधित आरपीएएस/ ड्रोन कार्यान्वयनासाठी जलद गतीने सशर्त सूट देण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालय आणि हवाई वाहतूक महासंचालनालयाने  GARUD पोर्टल (https://garud.civilaviation.gov.in)  सुरु केले आहे. GARUD म्हणजे गव्हर्मेंट ऑथरायझेशन फॉर रिलीफ युझिंग ड्रोन.दोन आठवड्याहून कमी काळात सक्षम प्राधिकरणाकडून आवश्यक मंजुरी आणि पोर्टल सुरु करणे ही हवाई वाहतूक मंत्रालय, हवाई वाहतूक महासंचालनालय,एएआय आणि एनआयसीच्या संबंधित  अधिकाऱ्यांच्या कठोर मेहनत आणि निष्ठेची साक्षच आहे.पुढे जाण्यासाठी  परवानगी मिळाल्यानंतर  केवळ आठ दिवसात पोर्टल उभारून,, विकसित करून एनआयसीचे वरिष्ठ सिस्टम एनालिस्ट विक्रम सिंग यांनी सुरु केले.

आरपीएच्या  कार्यान्वयन विषयीचे  नियम,  हवाई नियमावली 1937 च्या नियम 15 ए आणि नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने 27.8.2018 ला जारी केलेल्या  सीएआर च्या कलम 3  शृंखला X भाग 1 अंतर्गत  येतात.

 

सशर्त सूट देण्यात आल्यास खालील अटींवर देण्यात येईल-

कोविड  -19 संदर्भात, हवाई देखरेख, हवाई छायाचित्रण, सार्वजनिक घोषणेसाठी  सरकारी  संस्थेकडून तैनात करण्यात आलेल्या आरपीए साठी, ही सशर्त सूट मर्यादित राहील. कोविड-19 शी संबंधित मात्र आरपीए व्यतिरिक्त इतर कामासाठी वेगळी परवानगी घ्यावी लागेल.

ब्यॅटरी वर चालणाऱ्या रोटरी विंग आरपीए पुरती ही सशर्त सूट मर्यादित राहील.

आरपीएच्या सुरक्षित कार्यान्वयनाची  जबाबदारी पूर्णतः सरकारी संस्थेची राहील.

सरकारी संस्था स्वतःचा आरपीए किंवा दुसऱ्या आरपीए सेवा पुरवठादाराकडून  आरपीए घेऊ शकते. यासंदर्भात आरपीए आणि सेवा पुरवठादार यांची सुरक्षाविषयक पडताळणीची जबाबदारी सरकारी संस्थेची राहील आणि आरपीए चे काम सुरु करण्यापूर्वी ही पडताळणी आवश्यक आहे. आरपीएचे नियंत्रण, सुरक्षा आणि ताबा यासाठी सरकारी संस्था जबाबदार राहील.

 

आरपीए आणि कार्यान्वयन यासाठी  खालील अटींची पूर्तता आवश्यक आहे-

आरपीए कडे,नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने जारी केलेला  विशिष्ट ओळख क्रमांक, युआयएन  किंवा ड्रोन स्वीकृती क्रमांक, डीएएन असणे आवश्यक आहे.

आरपीएचे एकूण वजन 25 किलो पेक्षा जास्त असता कामा नये.

नियंत्रण सुटल्यास  माघारी येण्यासाठी आरपीए, स्वयंचलित रिटर्न टू होम सुविधेने युक्त असले पाहिजे.

जमिनीवरून 200 फुट उंचीपर्यंतच कार्यान्वयन करता येईल.

लोक, इमारती, वाहने इत्यादींपासून सुरक्षित अंतरा वरूनच याचे  काम झाले पाहिजे.

आरपीए मधून  कोणताही पदार्थ टाकता किंवा उचलता किंवा फवारता कामा नये.

स्थानिक सूर्योदय ते सूर्यास्त या वेळेतच कामाला परवानगी राहील.

विपरीत  हवामानात आरपीए चे काम टाळले पाहिजे.

ब्यॅटरी रिझर्व 15 मिनिटावर आल्यास आरपीए उड्डाण तातडीने स्थगित केले पाहिजे.

एका व्यक्तीने, एका वेळी एकापेक्षा अधिक आरपीए कार्यान्वयन करता कामा नये. 

 

खालील भौगोलिक क्षेत्रात आरपीए  कार्यान्वयन करता येणार नाही- 

मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळूरू आणि हैदराबाद विमानतळाच्या  5 किमी परीघात वर उल्लेख केल्या व्यतिरिक्त,नागरी, खाजगी किंवा संरक्षण विमानतळाच्या 3 किमी परिघात कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरुपात प्रतिबंधित,आणि धोका क्षेत्रात नियंत्रण रेषेसह, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा यासह  आंतरराष्ट्रीय सीमेपासून 25 किमी अंतरात लष्करी आस्थापने, सुविधा किंवा लष्करी सराव करण्याच्या 3 किमी परिघात दिल्लीच्या विजय चौकाच्या 5 किमी गृह मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या धोरणात्मक ठिकाणांच्या 2 किमी परिघात पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात, अधिसूचित राष्ट्रीय उद्यानावर, वन्यजीव अभयारण्यावर पुढील आदेशापर्यंत ही तरतूद लागू राहील.कोणतेही  कारण न देता यामध्ये बदल करण्याचा किंवा मागे घेण्याचा किंवा वाढ करण्याचा अधिकार केंद्र सरकार राखून ठेवत आहे.

या जाहीर  नोटीस मधल्या तरतुदींचा भंग झाल्यास दिलेली सशर्त परवानगी रद्द बातल मानण्यात येईल  आणि संबंधित कायद्याखाली दंडात्मक  कारवाई करता येईल.

सार्वजनिक नोटीससाठी लिंक

 

G.Chippalkatti/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1622088) Visitor Counter : 145