गृह मंत्रालय
भारतात येण्याजाण्यासाठी आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावरील बंदी उठवली जात नाही तोवर अनिवासी भारतीय कार्डधारकांसाठी भारत दौऱ्याकरिता मल्टिपल एन्ट्री आजीवन व्हिसा सुविधा हक्क स्थगित
प्रविष्टि तिथि:
05 MAY 2020 7:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मे 2020
भारतात येण्याजाण्यासाठी आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावरील बंदी भारत सरकारकडून जोवर उठवली जात नाही तोवर अनिवासी भारतीय कार्डधारक म्हणून नोंदणी झालेल्या व्यक्तीला कुठल्याही कारणासाठी देण्यात आलेला मल्टिपल एन्ट्री आजीवन व्हिसा सुविधा हक्क स्थगित राहील. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केला आहे.
या काळात एखाद्या अनिवासी भारतीय कार्डधारक परदेशी नागरिकाला भारतात अपरिहार्य कारणासाठी भारतात येणे आवश्यक असेल तर त्या व्यक्तीने जवळच्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा. एखादी अनिवासी भारतीय कार्डधारक व्यक्ती यापूर्वीच भारतात असेल तर त्या व्यक्तीचे अनिवासी भारतीय कार्ड भारतातील त्यांच्या कितीही काळ अधिक भारतातील वास्तव्यासाठी वैध राहील.
मूळ आदेशासाठी इथे क्लिक करा.
****
B.Gokhale/S.Kakde/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1622086)
आगंतुक पटल : 203