आयुष मंत्रालय
कोविड-19 परिस्थिती संदर्भात आयुष उपचार प्रणालीच्या उपयुक्ततेविषयी आंतरशास्त्रीय अभ्यासांचे आरोग्य आणि आयुष मंत्र्यांचे हस्ते औपचारिकरीत्या उद्घाटन
Posted On:
07 MAY 2020 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2020
आरोग्य मंत्री हर्ष वर्धन आणि आयुष राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी आज नवी दिल्ली येथे संयुक्तपणे आयुर्वेद हस्तक्षेपावरील क्लिनिकल संशोधन अभ्यासक्रम सुरु केला, कोविड-19 आणि आयुष संजीवनी अॅप्लिकेशन ची प्रमाणित काळजी घेण्यासाठी हे हस्तक्षेप पूरक आहेत. आयुष मंत्री गोव्याहून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
याप्रसंगी डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, कोविड-19 चा प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार वर्गीकृत, पूर्वदक्षता आणि स्वयंप्रेरित दृष्टीकोनातून विविध उपाययोजना राबवीत आहे. या सर्व उपाययोजनांचे उच्च स्तरावर पुनरावलोकन आणि परीक्षण केले जाते.
डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, “पारंपारिक औषधांचा भारताचा इतिहास फार प्राचीन असून आयुर्वेद क्षेत्रात भारत अग्रेसर आहे, आयुष प्रणालीच्या क्लिनिकल अभ्यासाच्या माध्यमातून कोविड-19 साथीच्या आजाराच्या समस्येवर उपाय करण्याच्या दृष्टीने आयुष मंत्रालय कार्यरत आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की आयुष मंत्रालयाने विकसित केलेले आयुष संजीवनी मोबाईल अॅप हे आयुष उपचारांची स्वीकृती आणि वापर आणि नागरिकांमधील उपाययोजना आणि कोविड -19 च्या प्रतिबंधावरील परिणाम यावर डेटा तयार करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
याप्रसंगी श्रीपाद नाईक म्हणाले की, आयुष मंत्रालयाने आयुष प्रणालीच्या क्लिनिकल अभ्यासाच्या माध्यमातून देशातील कोविड-19 साथीच्या आजाराच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे आणि आणि उच्च जोखमीच्या लोकसंख्येमध्ये आयुष आधारित प्रोफिलेक्टिक हस्तक्षेपांच्या परिणामाचा अभ्यास देखील करत आहे. मंत्रालय आयुष उपचारांचे आणि नागरिकांमधील कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांच्या परिणामांचा देखील अभ्यास करत आहे.
नाईक पुढे म्हणाले की, आयुष मंत्रालयाने या समस्येवर अधिक चांगला तोडगा काढण्यासाठी आणि रोगाच्या प्रतिबंधासाठी आयुषच्या भूमिकेचे मूल्यांकन करण्यासाठी चार क्लिनिकल आणि लोकसंख्या आधारित अभ्यास सुरू केले आहेत.
आयुष मंत्रालयाने या उपक्रमाची रणनिती तयार करणे आणि ती विकसित करणे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली अंतरज्ञानशाखीय विषय म्हणून आयुष संशोधन आणि विकास कृतीदलाची स्थापना केली आहे, ज्यामध्ये तज्ज्ञांच्या गटाचा समावेश आहे अशी माहिती आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेच यांनी दिली.
आयुषचे सहसचिव पी. एन. रणजीत यांनी यावेळी कोविड-19 संबंधित आयुष आधारित 3 अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली तसेच सादरीकरण देखील केले. त्यांनी संजीवनी अॅपबद्दल माहिती दिली तसेच आयुर्वेदाचे फायदे देखील सांगितले. आयुष आधारित तीन अभ्यासांविषयी बोलताना त्यांनी कल्पनांचा विकास, संसाधनांची जमवाजमव, कृती दळ तयार करणे, एसजीपीजीआय, एम्स, आयसीएमआर, सीएसआयआर अशा विविध संस्थांनी एकत्र येऊन या संशोधन कल्पना प्रत्यक्षात आणण्याविषयी संपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमात औपचारिकरीत्या खलील अभ्यास सुरु करण्यात आले:
- रोगप्रतिबंधक म्हणून आणि कोविड- 19 बाबत सर्वसाधारणपणे घेण्याची प्रमाणित काळजी म्हणून आयुर्वेद हस्तक्षेपांवर प्रयोगशालेय संशोधन अभ्यास: आयुष मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय (एमओएचएफडब्ल्यू) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या माध्यमातून आयसीएमआरच्या तांत्रिक मदतीने प्रयोगशालीय अभ्यास केला जाणार आहे. अंतःविषय आयुष संशोधन आणि विकास कृतीसमितीने कोविड-19 च्या पॉझिटिव्ह केसेसमधून आढावा घेऊन आणि देशभरातील विविध संस्थांमधील अश्वगंधा, यष्टीमधू, गुडूची + पिंपळी आणि संमिश्र औषधी अशा चार वेगवेगळी सूत्रे (आयुष – 64) असलेल्या हस्तक्षेपांचा अभ्यास करीत आहेत, अशा उच्चपदस्थ तज्ज्ञांशी सल्लामसलत प्रक्रिया पार पाडून रोगप्रतिबंधक औषधांचा अभ्यास आणि त्याबाबतचे हस्तक्षेप यांच्यासाठी काही संकेतांचा आराखडा तयार केला आहे.
- कोविड – 19 वरील सौम्य ते मध्यम उपचारांसाठी उपचारांचे मानक म्हणून आयुर्वेदीय सूत्रांच्या परिणामकारकतेचे वैशिष्ट्य : यादृच्छिकरण, खुला वर्ग, समांतर कार्यक्षमता, सक्रीय नियंत्रण, बहु केंद्र औषध अन्वेषण चाचणी.
- कोविड 19 साथीच्या दरम्यान जास्तीची जोखीम असलेल्या विषयांमध्ये सार्स – कोव्ह – 2 च्या विरुद्ध रोगप्रतिबंधक औषध म्हणून अश्वगंधा : आरोग्य सेवा प्रदात्यांमधील हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणखी एक अन्य औषधी घटक यातील तुलना.
- आयुष आधारित रोगप्रतिबंध औषधांच्या प्रभावावर लोकसंख्या आधारित मध्यवर्ती अभ्यास : कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी मोठा धोका असलेल्या लोकसंख्येतील आयुर्वेदिक हस्तक्षेपांच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी आयुष मंत्रालय लोकसंख्या आधारित अभ्यास सुरू करीत आहे. कोविड 19 साठी आयुष हस्तक्षेपाच्या प्रतिबंधात्मक संभाव्यतेचे मूल्यांकन करणे आणि मोठी जोखीम असणाऱ्या जनसंख्येच्या राहणीमानाच्या गुणवत्तेत होणाऱ्या सुधारणेचे मूल्यांकन करणे ही मुख्य उद्दिष्टे आहेत. आयुष मंत्रालयांतर्गत चार संशोधन परिषदांच्या माध्यमातून आणि देशभरातील 25 राज्यांमधील राष्ट्रीय संस्था आणि अंदाजे पाच लाख लोकसंख्या असलेल्या अनेक राज्य सरकारांच्या कक्षेत हा अभ्यास केला जाईल. कोविड 19 सारख्या महामारी दरम्यान आयुष हस्तक्षेपाची प्रतिबंधात्मक क्षमता वैज्ञानिक पुराव्यांद्वारे समजून घेण्यासाठी या अभ्यासाचा निकाल हा निश्चितच एक नवे क्षितिज निर्माण करेल.
- कोविड 19 ला प्रतिबंध करण्यासाठी आयुष सल्लागारांच्या भूमिकेची स्वीकृती आणि त्याच्या वापरासंबंधी प्रभावी मूल्यांकनासाठी आयुष संजीवनी अप्लिकेशनद्वारे अभ्यास : पन्नास लाख सारख्या मोठ्या लोकसंख्येची माहिती गोळा करण्यासाठी आयुष मंत्रालयाने आयुष संजीवनी मोबाईल अपलिकेशन तयार केले आहे. मूळ अपेक्षित निकालांमध्ये स्वीकृतीवरील माहिती समाविष्ट करणे आणि आयुष सल्लागारांचा सहभाग आणि लोकसंख्येबाबतचे उपाय आणि कोविड 19 च्या प्रतिबंधात त्याचा परिणाम नोंदविणे.
* * *
G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane
(Release ID: 1621855)
Visitor Counter : 280