रेल्वे मंत्रालय

मालवाहू गाड्यांव्दारे रेल्वेच्या महसूलात भर; लॉकडाऊन कालावधी दरम्यान 54,292 टन माल वाहतुकीद्वारे मिळाला 19.77 कोटी रुपये महसुल

Posted On: 06 MAY 2020 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6  मे 2020

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान छोट्या पार्सल स्वरूपात वैद्यकीय पुरवठा, वैद्यकीय उपकरणे, अन्न इत्यादीसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. ही अत्यावश्यक गरज भागवण्यासाठी, भारतीय रेल्वेने ई-कॉमर्स संस्था आणि राज्य सरकारसह इतर ग्राहकांसाठी जलद मोठ्या प्रमाणावरील वाहतुकीसाठी रेल्वे मालवाहू गाड्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. आवश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा व्हावा यासाठी रेल्वेने निवडक मार्गांवर वेळापत्रकानुसार विशेष मालवाहू गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या विशेष मालवाहू गाड्यांसाठी विभागीय रेल्वे नियमितपणे मार्ग निवडून सूचित करीत आहे. सध्या या गाड्या ब्याऐंशी (82) मार्गांवर चालविल्या जात आहेत. या गाड्यांच्या समावेशनासाठी खालील मार्ग निवडले गेले आहेत:

  1. देशातील बरीच शहरे, जसे की दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगलुरू आणि हैदराबाद दरम्यान नियमित वाहतूक.
  2. राज्य-राजधानी / महत्वाच्या शहरांमधून राज्यातील सर्व भागांमध्ये वाहतूक
  3. देशाच्या ईशान्य भागात वाहतूक सुनिश्चित करणे.
  4. अतिरिक्त साठा असणाऱ्या प्रदेशांमधून (गुजरात, आंध्रप्रदेश) सर्वाधिक मागणी असणाऱ्या प्रदेशांना दूध व दुग्धजन्य उत्पादनांचा पुरवठा.
  5. उत्पादित प्रदेशाकडून इतर जीवनावश्यक वस्तूंचा (शेतीविषयक साधने, औषधे, वैद्यकीय उपकरणे इ.) देशाच्या इतर भागात पुरवठा.

रेल्वेच्या मालवाहतूक गाड्यांच्या वाढत्या सेवेकडे देशातील मालवाहतूक अधिक वेगवान, वातानुकूलित आणि सर्वांसाठी फायदेशीर होण्यासाठीचे प्रयत्न म्हणून पाहिले जाऊ शकते.

ई-कॉमर्स आणि वाहतूक कंपन्यांना रेल्वेच्या जवळ आणण्यासाठी रेल्वे तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी नुकतीच बैठक घेतली.

05 मे 2020 रोजी 66 मालवाहू विशेष गाड्या चालविण्यात आल्या त्यापैकी 65 गाड्या वेळापत्रकानुसार धावल्या. या गाड्यातून 1,936 टन मालाची वाहतूक झाली आणि रेल्वेला 57.14 लाख रुपये महसूल मिळाला.

05.05.2020 पर्यंत धावलेल्या एकूण मालवाहू गाड्यांची संख्या 2,067 होती त्यापैकी वेळापत्रकानुसार चालविलेल्या गाड्या 1,988 होत्या. या गाड्यातून 54,292 टन मालाची वाहतूक झाली आणि रेल्वेला 19.77 लाख रुपये महसूल मिळाला.

 

B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1621570) Visitor Counter : 173