गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर विशाखापट्टणम इथले स्मार्ट सिटी कार्यान्वयन केन्द्र पूर्णवेळ कार्यान्वीत


या केन्द्राच्या माध्यमातून पाहणी, आढावा घेणे आणि जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जात आहेत

Posted On: 01 MAY 2020 6:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 मे 2020

 

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनासाठी विशाखापट्टणम इथले स्मार्ट सिटी कार्यान्वयन केन्द्र 24*7 अर्थात पूर्ण वेळ सुरु आहे. तीन पाळ्यांमध्ये यात काम सुरु असुन पुढील कार्यक्रम या केन्द्राच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत.

  • कोविड-19 संदर्भात कशाप्रकारे सावधानता बाळगावी, कोणत्या उपाययोजना कराव्यात याची सूचना देणारी यंत्रणा शहरभरात मोक्याच्या 90 ठिकाणी उभारली आहे. यासाठी सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणेचा उपयोग केला आहे. 
  • कोविड-19 बाबत डिजिटल साईनबोर्ड अर्थात फलकावर महत्वाची माहिती आणि संदेश प्रसारित केले जात आहेत. शहरातल्या दहा मोक्याच्या ठिकाणी हे डिजिटल फलक बसवले आहेत. 
  • सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी शहरात महत्वाच्या ठिकाणी पाचशे कॅमेरे बसवले आहेत. 
  • कोविड मदतकक्ष आणि संपर्क केन्द्र सातत्याने, अगदी दररोज CMOH आणि  DMOH च्या समन्वयानं परदेशातून आलेल्या नागरीकांवर लक्ष ठेवून आहे. मदतकक्ष आणि संपर्क केन्द्र चोवीस तास कार्यरत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा तसेच शहर स्तरावरील अधिकाऱ्यांचे यासाठी वेळोवेळी सहकार्य घेतले जात आहे. 
  • विनामूल्य संपर्क क्रमांकही जाहीर केला असून, तिथे नागरीकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जात आहेत. तसेच आलेल्या महत्वाच्या दूरध्वनींचा पाठपुरावा केला जातो. 
  • परदेशातून आलेल्या नागरीकांची माहिती अद्यायावत ठेवण्यासाठी तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक मोबाईल अॅप्लिकेशनही तयार केले आहे. अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार समूह  पाळत आणि अति धोका असलेल्या ठिकाणांना विशिष्ट रंग ठरवले आहेत. त्या रंगाचा आलेख किंवा नकाशाची डिजिटल स्वरुपातही वर्गवारी केली आहे. उदाहरणार्थ :  0-14, 15-28 आणि 28 पेक्षा जास्त दिवसांची वर्गवारी इत्यादी भौगोलिक माहिती प्रणालीच्या माध्यमातून  घेतली जाते. जिल्हा प्रशासन वरील पद्धतीच्या आधारावर काही नमुनेही गोळा करीत आहे. 
  • निषिध्द परिसराच्या अर्थात प्रशासनाने सील्ड केलेल्या परिसराच्या सर्वेक्षणासाठी स्थानिक पातळीवर एक मोबाईल अॅप्लिकेशनही तयार केले आहे.
  • ए एन एम/ आशा/ तसेच इतर आरोग्य स्वयंसेवक बाधित भागात कार्यरत आहेत. विशाखापट्टणममधे 20 शीघ्र प्रतिसाद दलाची पथके तैनात केली असून संबंधित पथकांच्या रुग्णवाहिकांमधल्या मोबाईल टॅबद्वारे त्यांना संचालित केले जाते. संबंधित पथकातील डॉक्टर्स तपासणी केलेल्या संशयित रुग्णांची माहिती थेट पाठवतात. अपलोड करतात. त्याचवेळी या माहितीचा आढावा संबंधित अधिकारी घेतात. लक्षणे आढळणाऱ्या नागरीकांचे नमुने गोळा करण्यासाठी चार फिरती पथके तैनात आहेत. या पथकांवर शहर कार्यान्वयन केन्द्राच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते. यासाठी मोबाईल टॅब प्रणालीचा उपयोग केला जातो. त्यानंतर डॉक्टर त्याचवेळी तपासणी केलेल्या नागरीकांची माहिती मोबाईल अॅप्लिकेशन द्वारे अपलोड करतात. प्रत्येक घरी जाऊन स्वयंसेवक सर्वेक्षण करत आहेत. त्यांनी सादर केलेले अहवाल नियमितपणे संबंधित समिती आणि प्रभाऱ्यांकडे पाठवले जातात. 
  • निषिध्द भागात आरोग्य विभागाद्वारे केले जाणारे निर्जंतुकीकरण तसेच ब्लिचिंगसारख्या कामांची पाहणी करण्यासाठी, त्यावर लक्ष ठेवण्याकरीताही मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले आहे. 
  • अत्यावश्यक सेवा आणि किराणा पुरवठादारांची माहिती सोशल अर्थात समाज माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवली जाते. अन्नधान्य तसेच अत्यावश्यक सेवांबाबत काही तक्रार असेल तर 0891- 2869106, 2869110 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
  • सावधानता बाळगण्याबाबतचे संदेश, माहिती ट्विटर, फेसबूक यासारख्या समाजमाध्यमातूम सातत्याने प्रसारित केली जात आहे.

 


* * * 

B.Gokhale/V.Ghode/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1620098) Visitor Counter : 167