आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. हर्ष वर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब सोबत साधला संवाद


कोविड-19 विरुद्धच्या लढाईत ‘आपण’ या शब्दाचे सामर्थ्य आणि शारीरिक अंतर सर्वात महत्वाचे – डॉ. हर्ष वर्धन

Posted On: 29 APR 2020 8:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 29 एप्रिल 2020

 

कोविड-19 विरुद्धच्या आपल्या लढाईत लायन्स क्लबच्या सदस्यांनी दिलेले योगदान विशेषतः पीएम केअर्स निधी, रुग्णालयांसाठी उपकरणे, सॅनिटायझर्स, अन्न, पीपीई संच आणि एन95 मास्क इत्यादी स्वरुपात दिलेले योगदान खरेच कौतुकास्पद असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. ते आज देशभरातील आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबच्या सदस्यांसोबत नवी दिल्ली येथे व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी बोलत होते.

पोलिओ, मोतीबिंदू या सारख्या अनेक मोहिमांमध्ये लायन्स क्लबचे सदस्य वर्षानुवर्षे देत असलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले आणि कोविड-19 विरुद्धच्या लढाईत सरकारच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा सामुहिकपणे पाठबळ देण्यासाठी त्यांना  प्रोत्साहित केले, “जगातील 200 हून अधिक देशांमध्ये पसरलेल्या कोविड-19 वर मात करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे,” असे ते म्हणाले. कोट्यावधी लोकांना जेवण दिल्याबद्दल आणि अनेकांना अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे आणि संरक्षक साधने दिल्याबद्दल त्यांनी या सदस्यांचे कौतुक केले.

कोविड-19 चा सामना करण्यासाठी भारताच्या दृष्टिकोनाला अधोरेखित करताना ते म्हणाले, “या वेळी आमच्या दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य पाच पटींनी वाढले आहे: (i) परिस्थिती संदर्भात सतत जागरूकता राखणे, (ii) प्रामाणिक आणि कृतीशील दृष्टीकोन, (iii) सतत विकसित होत असलेल्या परिस्थितीनुसार वर्गीकृत प्रतिसाद, (iv) सर्व स्तरावर आंतर-क्षेत्रीय समन्वय आणि सर्वात शेवटी, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे (v) या आजाराचा सामना करण्यासाठी लोकांची चळवळ तयार करणे.

या आजाराचा सामना करण्याच्या भारताच्या सामर्थ्याविषयी मंत्री म्हणाले, “भारताने भूतकाळात देखील आंतराष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक आरोग्याच्या आपत्कालीन आणि साथीच्या आजारांची परिस्थिती यशस्वीरीत्या हाताळली आहे.” ते पुढे म्हणाले की, “सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थिती व्यवस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावलीनुसार आपल्या देशात आवश्यक राष्ट्रीय मूलभूत क्षमता आहेत. एकात्मिक आजार निरीक्षण कार्यक्रम (आयडीएसपी), राष्ट्रीय स्तरावर साथीच्या आजारांचे निरीक्षण करणारी यंत्रणा आहे, कोविड प्रतिसादासाठी या यंत्रणेला सक्रीय करण्यात आले असून डिजिटल इनपुट्स सह तिला अधिक मजबूत केले जात आहे.”

ते म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून देशात दुप्पट दर 11.3 दिवस आहे. ते पुढे म्हणाले जागतिक मृत्यू दर जवळपास 7% असला तरी भारताचा मृत्यू दर 3 टक्यांच्या आसपास आहे आणि सह-अनारोग्यता असलेल्या व्यक्तींचा मृत्यू दर जवळपास 86% आहे.

त्यांनी हे देखील सांगितले की, केवळ 0.33% रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, 1.5% रुग्ण ऑक्सिजनवर आहेत आणि 2.34% रुग्ण आयसीयु मध्ये आहेत, ही सर्व आकडेवारी संपूर्ण देशभर पुरविण्यात येत असलेल्या आरोग्य सेवांची गुणवत्ता प्रतिबिंबित करते. भविष्यातील कोणत्याही परीस्थितीला सामोरे जाण्यासाठी देश अलगीकरण बेड्स, व्हेंटिलेटर, पीपीई, मास्क इत्यादींनी सुसज्ज आहे.

288 सरकारी प्रयोगशाळा 97 खाजगी प्रयोगशाळांच्या शृंखलेसह सुमारे 16,000 नमुने संकलन केंद्र कार्यरत आहेत जे दररोज अंदाजे 60,000 चाचण्या करत आहेत; अशी माहिती त्यांनी दिली. सरकार येत्या काही दिवसात चाचणी क्षमता वाढवून ती प्रती दिन 1 लाख करण्याचे दिशेने काम करीत आहेत असे ते म्हणाले.

आरोग्य मंत्री पुढे म्हणाले की, लस विकसित व्हायला अजून काही कालावधी लागणार असल्याने लॉकडाऊन आणि शारीरिक अंतर हीच प्रभावी ‘सामाजिक लस’ आहे. ते म्हणाले की, “माझ्या अधिकाराखाली विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय नवोन्मेशावर काम करत असून चाचणी प्रक्रिया जलद करणाऱ्या काही प्रकल्पांना अर्थसहाय्य देत आहोत.”

आरोग्यमंत्र्यांनी नमूद केले की राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि समर्पित भागधारक आणि भागीदार यांच्यासह भारत कोविड -19 विरुद्धच्या लढाईत नक्कीच विजय प्राप्त करेल.

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1619397) Visitor Counter : 262