शिक्षण मंत्रालय

क्लास सेन्ट्रल लिस्टमध्ये 2019 च्या सर्वोत्तम 30 ऑनलाईन अभ्यासक्रमांमध्ये स्वयमचे 6 अभ्यासक्रम उपलब्ध

Posted On: 27 APR 2020 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27  एप्रिल 2020

 

क्लास सेन्ट्रलने (स्टॅनफोर्ड, एमआयटी, हार्वर्ड इत्यादी सर्वोत्तम विद्यापीठांमधील एक विनामूल्य ऑनलाइन कोर्स उर्फ ​​एमओओसी अ‍ॅग्रीगेटर) 2019 च्या 30 सर्वोत्तम ऑनलाईन अभ्यासक्रमांची यादी जाहीर केली असून त्यातील 6 अभ्यासक्रम हे स्वयमचे आहेत.

‘स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स’ (स्वयं) हे एक शाळा (इयत्ता 9 वी ते 12 वी) आणि पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाचा (आयसीटी) वापर करून ऑनलाईन अभ्यासक्रमांचे हे एक एकात्मिक व्यासपीठ आहे. आत्तापर्यंत स्वयमच्या माध्यमातून एकूण 2867 अभ्यासक्रम देण्यात आले असून जानेवारी 2020 च्या सत्रासाठी 568 अभ्यासक्रम अपलोड करण्यात आले आहेत. स्वयमच्या  व्यासपीठावर आतापर्यंत अंदाजे 57 लाख (57,84,770) विशिष्ठ वापरकर्त्यांची नोंदणी झाली असून स्वयमच्या विविध अभ्यासक्रमांसाठी 1.25 कोटी (125,04,722)  नावनोंदणी झाली आहे. हे विध्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकविशारदांसाठी देखील अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. swayam.gov.in या संकेतस्थळावरून आपण तिथे भेट देऊ शकतो.

2019 च्या सर्वोत्तम 30 ऑनलाइन अभ्यासक्रमांमध्ये स्वयमचे 6 अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहेत.

शैक्षणिक: एच.एन.बी. गढवाल विद्यापीठ (केंद्रीय विद्यापीठ) श्रीनगर गढवाल

डिजिटल मार्केटिंग : पंजाब विद्यापीठ चंडीगड

अ‍ॅनिमेशन: बनारस हिंदू विद्यापीठ

गणित अर्थशास्त्र : डुन विद्यापीठ, देहरादून

पायथॉन फॉर डेटा सायन्स : भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास

अर्ली चाईल्डहुड केअर अँड एज्युकेशन (ईसीसीई): अविनाशीलिंगम इन्स्टिट्यूट फॉर होम सायन्स अँड हाय एज्युकेशन फॉर वुमन, कोयंबटूर

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1618784) Visitor Counter : 122