कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
दिल्लीच्या 'रोटरी क्लब ऑफ दिल्ली हेरिटेज'मार्फत पीआयबीच्या सहकार्याने, पुनर्वापरायोग्य 50,000 मास्कचा पुरवठा
Posted On:
25 APR 2020 5:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2020
कोविड-19 आपत्कालीन परिस्थितीत देशवासीयांना या आजाराचा सामना करण्यासाठी गरजेच्या वस्तू पुरवून मदत करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, रोटरी क्लब ऑफ दिल्ली हेरिटेज, जवळपास 50,000 मुखाच्छादक मास्कचे विनामूल्य वाटप करीत आहे. पुनर्वापरायोग्य असे हे मास्क मोठ्या प्रमाणावर वाटप करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहेत. पीआयबी अर्थात पत्र सूचना कार्यालयाशी समन्वय साधून हे काम करण्यात येत आहे.
व्यावसायिक क्षेत्रातील विविध यशस्वी लोकांना मानवसेवा कार्यात सहभागी करून घेण्यासाठी व जगभर शांततेचा प्रसार करण्याच्या उद्दिष्टनाने प्रेरित होऊन, रोटरी इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेवा संघटना काम करते. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात घरी बसून काम करणाऱ्या महिला शिंप्यांकडून हे मास्क तयार करून घेतले गेले आहेत.
मास्कचे वितरण आज कुलदीप सिंग धतवालिया, प्रधान महासंचालक, पीआयबी यांच्या हस्ते झाले. तर रोटरी क्लब ऑफ दिल्ली हेरिटेजच्या वतीने राजीव जैन, अतिरिक्त महासंचालक, पीआयबी; आणि राकेश जैन अध्यक्ष, रोटरी हेरिटेज - यांनी यासाठी समन्वय साधून काम केले. हे मास्क, आज नॅशनल मीडिया सेन्टर येथे ईश सिंघल, पोलीस उपायुक्त, संसद मार्ग, दिल्ली पोलीस आणि मुकेश कुमार, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, केंद्रीय भांडार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याआधी प्रधान महासंचालकांनी मुद्रितमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही मास्कचे वाटप केले होते.

* * *
B.Gokhale/J.Waishampayan/D.Rane
(Release ID: 1618197)
Visitor Counter : 204