रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेच्या वतीने 22 एप्रिल, 2020 रोजी 112 रॅक्समार्फत 3.13 लाख टन अन्नधान्याची विक्रमी वाहतूक
अन्नधान्यासारखी कृषी उत्पादने संपूर्ण देशभरामध्ये वेळेवर पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वेचे सातत्याने प्रयत्न
1 ते 22 एप्रिल, 2020 या काळात भारतीय रेल्वेकडून 4.58 दशलक्ष टन अन्नधान्याची वाहतूक; गेल्यावर्षी याच कालावधीत 1.82 दशलक्ष टन अन्नधान्याची वाहतूक
Posted On:
23 APR 2020 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 एप्रिल 2020
कोविड-19 चा उद्रेक झाल्यामुळे संपूर्ण देशभर लॉकडाउन असताना, देशाच्या कोणत्याही भागात अन्नधान्याची टंचाई निर्माण होवू नये म्हणून भारतीय रेल्वेच्यावतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
प्रत्येक भारतीयाच्या घरामधे स्वयंपाकघर सुरळीत चालावे, कोणालाही अन्नधान्याचा तुटवडा भासू नये, यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील आहे. दि. 22 एप्रिल 2020 या एकाच दिवशी भारतीय रेल्वेने अन्नधान्याची विक्रमी वाहतूक केली. या दिवशी 112 रॅक्सच्या मार्फत 3.13 लाख टन अन्नधान्याची वाहतूक केली. याआधी दि. 9 एप्रिल, 2020 रोजी रेल्वेच्या मालवाहतूक गाड्यांमधून 92 रॅक्स म्हणजे 2.57 लाख टन अन्नधान्याची वाहतूक केली होती. तर दि. 14 एप्रिल आणि दि. 18 एप्रिल, 2020 रोजी 89 रॅक्स म्हणजेच 2.49 लाख टन अन्नधान्याची वाहतूक केली होती.
दि. 1एप्रिल, 2020 पासून ते 22 एप्रिल, 2020 पर्यंत भारतीय रेल्वेने 4.58 दशलश टन अन्नधान्याची वाहतूक केली. गेल्यावर्षी याच कालावधीत रेल्वेने 1.82 दशलक्ष टन अन्नधान्याची वाहतूक केली होती.
अन्नधान्यासारख्या कृषी उत्पादनांचा माल वेळेवर उचलून तो संपूर्ण देशभरामध्ये वेळेवर पोहोचवून त्याचा सर्वत्र पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वे खात्याच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. लॉकडाउनमध्ये माल रॅक्समध्ये चढवणे आणि उतरवून घेणे ही कामे वेगाने केली जात आहेत. यासाठी कृषी मंत्रालयाशी समन्वय साधला जात आहे.
G.Chippalkatti/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1617527)
Visitor Counter : 190
Read this release in:
Punjabi
,
Odia
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada