आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
मोबाईल रक्त संकलन व्हॅन आणि दळणवळणासारख्या सुविधा उपलब्ध करून तसेच ऐच्छिक रक्तदात्यांना एकत्रित करून रक्तसंक्रमणासाठी (ट्रान्सफ्युजन) पुरेसा रक्तसाठा ठेवा
कोविड-19 पासून बऱ्या झालेल्या रुग्णांना रक्तदानासाठी प्रोत्साहन द्या, जेणेकरून त्यांच्या रक्तातील पुनरारोग्यप्राप्त प्लाज्माचा उपयोग कोविड-19 बाधित रुग्णांना जलद गतीने बरे करण्यासाठी करता येईल : डॉ. हर्ष वर्धन
Posted On:
21 APR 2020 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2020
केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनी आज निर्माण भवन मध्ये आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमातून संपूर्ण भारतातील रेड क्रॉस योध्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले. त्यांना संबोधित करताना मंत्र्यांनी, कोविड-19 वर मात करण्यासाठी सरकार करत असलेल्या सर्व प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली. ओदिशा, तामिळनाडू, हरयाणा, आंध्रप्रदेश, आसाम, तेलंगणा, दिल्ली आणि कर्नाटक मधील भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या (आयआरसीएस) प्रतिनिधींनी त्यांच्या संबंधित शाखांमध्ये सुरु असलेल्या उपक्रमांची मंत्र्यांना माहिती दिली. यावेळी आयआरसीएसचे सचिव आर. के. जैन देखील उपस्थित होते.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री म्हणाले, “भारत हा जगातील पहिला देश आहे ज्याने जराही वेळ वाया न घालवता कोविड-19 संकटाचा सामना करण्याची तयारी दर्शविली. कोरोना विषाणू संदर्भात चीनने जेव्हा पहिल्यांदा जगाला खुलासा दिला तेव्हा त्याला प्रतिसाद देणारा भारत हा जगातील पहिला देश होता. दुसऱ्याच दिवशी भारताने परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी पाऊले उचलली आणि संयुक्त निरिक्षण गटाची पहिली बैठक झाली. कालानुरूप समोर येणाऱ्या परिस्थितीनुसार महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या अध्यक्षतेखाली एका मंत्री गटाची देखील स्थापन केली आहे. देशभरात पसरलेल्या या जीवघेण्या विषाणू विरुद्ध पुकारलेल्या लढाईत हा स्वीकारलेला मार्ग पुरेसा आहे.”
ते म्हणाले, “कोविड-19 महामारी विरुद्धच्या लढाईत भारत अग्रस्थानी आहे आणि विमानतळे, बंदर, शेजारील देशांच्या सीमांवर निरीक्षण, तपासणी आणि संपर्काचा मागोवा घेणे यासारख्या सावधगिरीच्या उपाययोजना केल्या आहेत. त्यांनी पुढे सांगितले कि, 23 मार्च 2020 रोजीच भारतातील सर्व विमानतळांवर सर्व आंतराष्ट्रीय उड्डाणांना न उतरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, “याआधी कोविड-19 चे नमुने तपासणीसाठी अमेरिकेला पाठवण्यात आले होते ज्यांचे परिणाम प्राप्त व्हायला खूप उशीर व्हायचा., परंतू सद्य संकट परिस्थितीत भारताने नमूना चाचणीसाठी जवळपास 200 प्रयोगशाळा विकसित केल्या आहेत. याव्यतिरिक्त या भयानक विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी योग्यवेळी लॉकडाऊन लागू केले. ते म्हणाले, सध्या भारतात कोविड-19 समर्पित रुग्णालये, पीपीईएस, एन95 मास्क, व्हेंटिलेटर आणि औषधे उपलब्ध आहेत. उर्वरित जगाच्या तुलनेत आपण अधिक चांगल्या परिस्थितीत आहोत.
त्यांनी प्रतिनिधींना ऐच्छिक रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रक्तदात्यांची नेण्या-आणण्याची सोय करून रक्ताचा पुरेसा साठा करण्याचे आवाहन केले. या व्यतिरिक्त केंद्रीय मंत्र्यांनी इंडियन रेडक्रॉस सोसायटीला नियमित रक्तदात्यांच्या आवारात मोबाइल रक्त संकलन व्हॅन पाठविण्यास सांगितले जेणेकरून ते ह्या कठीण काळात रक्तदानासाठी पुढे येतील. केंद्रीय मंत्री म्हणाले की त्यांनी ऐच्छिक रक्तदानास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य आरोग्य मंत्र्यांना पत्रही लिहिले आहे.
डॉ. हर्षवर्धन यांनी आयआरसीएस ला विनंती केली की त्यांनी कोविड-19 पासून बऱ्या झालेल्या रुग्णांना रक्तदानासाठी प्रोत्साहन द्यावे जेणेकरून त्यांच्या रक्तातील पुनरारोग्यप्राप्त प्लाज्माचा उपयोग कोविड-19 बाधित रुग्णांना जलद गतीने बरे करण्यासाठी करता येईल. आयआरसीएस लवकरात लवकर हे पाउल उचलेले जेणेकरून बरे झालेल्या रुग्णांकडून गोळा केलेले रक्त कोरोना रूग्णाच्या फायद्यासाठी वापरले जाऊ शकते.
“कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात रेड क्रॉस सोसायटीने दिलेले योगदान कौताकास्पद आहे. वास्तविक पाहता, पीएम केअर्स निधी आणि रुग्णालयासाठी उपकरणे, सेनिटायझर्स, अन्न, पीपीई संच आणि N95 मास्क इत्यादीसाठी त्यांनी दिलेले योगदान प्रशंसनीय आहे.” केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी रेडक्रॉसच्या सदस्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) च्या माध्यमातून संवाद साधताना असे म्हटले आहे की, कोविड-19 विरूद्ध लढा देण्यासाठी अधिकाधिक संबंधित लोकांना सामील व्हावे यासाठी त्यांनी मदत करावी.
आयआरसीएसचे सचिव आर. के. जैन म्हणाले, “कोविड-19 च्या दुष्परिणामांवर मात करत या आव्हानाचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा रेड क्रॉसर्स भारत सरकारबरोबर काम करण्याची दृढ वचनबद्धता व्यक्त करण्यासाठी येथे उपस्थित आहेत. जगातील 215 देशांमध्ये पसरलेल्या कोविड-19 ला पराभूत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. ” ते पुढे म्हणाले, “इंडियन रेडक्रॉस ही एक स्वयंसेवी मानवताहितवादी संस्था आहे आणि देशभरात यांच्या 1100 हून अधिक शाखा आहेत; ज्याच्या माध्यमातून ते आपत्ती / आपत्कालीन परिस्थितीत सहाय्य पुरवतात आणि असुरक्षित लोक आणि समाजाच्या संचाच्या आरोग्याची काळजी घेतात. इंडियन रेडक्रॉसचे मिशन हे सर्व प्रकारच्या मानवतावादी उपक्रमांना प्रेरणा, प्रोत्साहित करणे आहे जेणेकरुन मानवी त्रास कमी होऊ शकेल. ”
शेवटी डॉ. हर्ष वर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उपस्थित प्रत्येकाचे आभार मानले आणि चांगले काम सुरू केल्याबद्दल आणि कोविड -19 च्या विरोधात अथक प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1617011)