पंतप्रधान कार्यालय
भारत आणि अफगाणिस्तान कोविड-19 चा सामना एकजुटीने आणि सामाईक निर्धाराने करतील- पंतप्रधानांचे प्रतिपादन
Posted On:
20 APR 2020 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2020
भारत आणि अफगाणिस्तान कोविड-19चा सामना एकजुटीने आणि सामाईक निर्धाराने करतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
हायड्रोक्सिक्लोरोक्विन, पॅरासेटामोल आणि इतर सामग्रीची मदत केल्याबद्दल अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष डॉ. अश्रफ घनी यांनी भारताचे आभार मानले आहेत. त्यासंदर्भात त्यांनी केलेल्या ट्वीटला पंतप्रधानांनी उत्तर दिले आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात त्यांचे ऐतिहासिक संबंध, भौगोलिक स्थान आणि संस्कृती यांच्यावर आधारित वैशिष्ट्यपूर्ण मैत्री आहे. आपण प्रदीर्घ काळ एकत्रितरित्या दहशतवादाच्या समस्येच्या विरोधात लढत आहोत. तशाच प्रकारे आपण कोविड-19च्या विरोधातही एकजुटीने आणि सामाईक निर्धाराने संघर्ष करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घनी यांच्या ट्वीटच्या उत्तरादाखल म्हटले आहे.
India and Afghanistan share a special friendship, based on ties of history, geography, and culture.
For long, we have fought jointly against the scourge of terrorism. We will similarly combat COVID-19 together, with solidarity and shared resolve. @ashrafghani https://t.co/du6Rw0jvPV
— Narendra Modi (@narendramodi) April 20, 2020
B.Gokhale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1616541)
Visitor Counter : 241
Read this release in:
English
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam