श्रम आणि रोजगार मंत्रालय
देशभरातील कामगारांच्या समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यात समन्वय राहण्यासाठी नोडेल अधिकारी नेमावेत- संतोष गंगवार यांचे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पत्र
प्रविष्टि तिथि:
18 APR 2020 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2020
केंद्रीय श्रेम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारांना पत्र पाठवून श्रमविभागातील एक अधिकाऱ्याची नोडेल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याची विनंती केली आहे. कोविड-19 मुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात देशभरातील कामगारांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या नियंत्रण कक्षासोबत समन्वय राखण्याचे काम हा नोडेल अधिकारी करेल. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील श्रम मंत्रालयांना लिहिलेल्या या पत्रात, त्यांनी म्हटले आहे की, श्रम विभागातील प्रत्येक अधिकाऱ्याला 20 नियंत्रण कक्षांची माहिती द्यावी. केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित प्रयत्नांतून कामगार-मजुरांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे.
श्रम आणि रोजगार मंत्रालयाने, अलीकडेच, मुख्य कामगार आयुक्तांच्या नेतृत्वाखाली 20 नियंत्रण कक्ष स्थापन केले असून, त्याद्वारे लॉंकडाऊनच्या काळात कामगारांची व्यवस्था आणि समस्या यावर उपाययोजना केल्या जात आहेत.
मात्र, गेले काही दिवस या नियंत्रण कक्षातून काम होत असतांना, असे लक्षात आले की कालपर्यंत एकूण 20 नियंत्रण कक्षात आलेल्या 2100 तक्रारींपैकी, 1400 तक्रारी विविध राज्यांशी संबंधित होत्या. श्रमविभाग ही दोन्ही सरकारांचा समवर्ती विभाग असल्याने, दोन्ही सरकारांमध्ये समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे, हे लक्षत घेऊन, हे पत्र लिहिण्यात आले आहे. मंत्रालयाने सर्व 20 नियंत्रण कक्षांचे आणि संबधित अधिकाऱ्यांच्या नावांची यादीही सर्व राज्यांना पाठवली आहे.
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1615729)
आगंतुक पटल : 238
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam