दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सर्व टपाल कर्मचाऱ्यांना रु दहा लाख भरपाई देणार
Posted On:
18 APR 2020 2:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2020
टपालखात्याचे काम हे अत्यावश्यक सेवेत गणले जाते. 15 एप्रिल 2020 ला निर्देशित केलेल्या MHA OM No. 40-3/2020-DM-I (A) च्या para -11 (iii) नुसार,सर्व टपाल सेवांचा उल्लेख आहे.
कोविड-19 च्या संदर्भातील परिस्थिती लक्षात घेऊन, टपाल कर्मचारी ड्युटीवर असताना या आजाराला बळी पडल्यास 10 लाखाची भरपाई देण्याचे ठरवण्यात आले आहे. ग्रामीण डाक सेवकांसह सर्व टपाल कर्मचाऱ्यांना हे लागू असेल. या संबधीचे निर्देश लगेचच अंमलात येतील आणि ते COVID-19 चे हे संकट ओसरेपर्यंत लागू असतील.
ग्रामीण डाक सेवकांसह सर्वच टपाल कर्मचारी ग्राहकांना टपालाशिवाय विविध सेवा पोहचवण्यात मोलाची भूमिका बजाव आहेत. यात पोस्टल बचत खाते (पोस्ट ऑफिस सेव्हींग बँक), पोस्टल जीवन विमा, कोणालाही कोणत्याही बँकेतून पैसे काढण्याची आधारकार्ड आधारित पैसे काढण्याची सुविधा (AePS) या सारख्या अनेक सेवांचा समावेश आहे. याशिवाय टपालखाते स्थानिक प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या योग्य परवानगीने COVID-19 संच, खाद्यपदार्थाची पाकिटे, आणि औषधे देशाच्या विविध भागात पोचवतात. अश्या प्रकारे टपाल कर्मचारी आपल्या दैनंदिन विभागीय कार्याप्रमाणेच, कोविड-19च्या या संकटकाळात सामाजिक कार्यातही सहभागी होत आहे.
B.Gokhale/V.Sahjrao/P.Malandkar
(Release ID: 1615668)
Visitor Counter : 232
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam