विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्रीय औषध संशोधन संस्थेचे प्रयत्न
Posted On:
18 APR 2020 2:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2020
कोविड-19 महामारी आणि कोरोना विषाणू याविषयी संपूर्ण जगभरात संशोधन सुरू आहे. भारतामध्येही अनेक वैद्यकीय, औषध निर्मिती संस्था या महामारीला रोखण्यासाठी आणि त्यावरच्या औषधाचे संशोधन करीत आहेत. सीडीआरआय म्हणजेच केंदीय औषध संशोधन संस्था, सीएसआयआर म्हणजेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था यांनी केजीएमयू म्हणजेच किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठाबरोबर एक सामंजस्य करार केला आहे. यानुसार संशोधनाचे काम सुरू आहे. कोरोना विषाणूमध्ये असलेल्या पाच अनुलंबनापैकी तीनची रचना कशी आहे, याविषयीचा शोध घेण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातल्या कोविड-19च्या रुग्णांकडून प्राप्त झालेल्या काही नमुन्यांच्या आधारे संशोधन कार्य सुरू आहे. लखनौच्या प्रयोगशाळेमध्ये आत्तापर्यंत झालेल्या संशोधनानुसार कोरोना विषाणूमध्ये असलेल्या प्रकारांची क्रमवारी लावण्याचे काम केले जात आहे. ही क्रिया प्रथम डिजिटल आणि आण्विक दक्षतेनुसार करण्यात येणार आहे.
कोविड-19 च्या विषाणूंचे आठ वेगवेगळे प्रकार असतात आणि त्यांच्यामुळे संसर्ग होतो, असे आत्तापर्यंत लक्षात आले आहे. विषाणूच्या क्रमवारीमध्ये बदल असेल तर प्रस्तावित उपचारांच्या धोरणांवर त्याचा परिणाम होवू शकतो की नाही, याचे विश्लेषण करण्यासाठी एक पथक कार्यरत आहे.
कोविड-19च्या विरोधात लढा देण्यासाठी ज्या औषधांचा वापर केला जातो त्यांच्याविषयी सीडीआयआयचे आणखी एक पथक संशोधन करीत आहे. यामध्ये आपल्या रुग्णालयांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या औषधांचा कोविड-19 आजार बरा करण्यासाठी वापर करता येवू शकेल काय, याविषयीही संशोधन सुरू आहे. कोरोना बाधितांना सध्या उपलब्ध असलेली औषधे उपयोगी ठरली तर एकूणच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढणार आहे. आणि ज्ञात औषधांची पूर्तता तातडीने करणे, हे महत्वाचे कार्य आपल्याला करावे लागणार आहे. अशी माहिती ‘सीएसआयआर-सीडीआरआय’चे संचालक प्राध्यापक तापस कुमार यांनी दिली आहे.
या औषध संशोधन संस्थांकडे वैविध्यपूर्ण जैविक रेणूंच्या नमुन्यांचा साठा आहे. त्यांच्या ‘सिलिको’चा वापर करून सार्स-सीओव्ही-2 या आजारावर वापरले जाणारे औषध कोरोना रोखण्यासाठी मदत ठरू शकते का, याची चाचणी करण्यात येत आहे. यासाठी ‘टारगेट बेस्ड स्क्रिनिंग सिस्टिम’चा वापर करून मूल्यांकन करण्यात येत आहे. यामध्ये एम-प्रोटीझ, सीएल-प्रोटीनेस, आरएनए आधारित आरएनए पॉलिमरेझ, स्पाइकप्रोटीन-एसीई2 सिस्टिम आणि इतर लक्ष्यांवर सध्या काम करण्यात येत आहे. त्यांची बांधणी, प्रतिबंध तसेच त्यांच्या सजीवतेचे मूल्यांकन करण्याचे काम केजीएमयूच्या आणि इतर प्रयोगशाळांमध्ये सुरू असल्याची माहिती डॉ. कुमार यांनी दिली.
या संशोधन कार्यात केजीएमयूच्या वैज्ञानिकांच्या पथकाचे नेतृत्व प्राध्यापक अमिता जैन करणार आहेत. तर सीएसआयआर- सीडीआरआयच्या संशोधकांच्या पथकाचे नेतृत्व प्राध्यापक आर. रविशंकर करणार आहेत. सीएसआयआर- सीडीआरआयच्या प्रयोगशाळेत स्क्रिनिंगसंबंधित काम करण्यात येणार आहे. केजीएमयूचे माजी विद्यार्थी आणि सीडीआरआयचे विषाणूतज्ञ डॉ. राज कमल त्रिपाठी त्याचे नेतृत्व करत आहेत.
U.Ujgare/S.Bedekar/P.Malandkar
(Release ID: 1615656)
Visitor Counter : 233
Read this release in:
Urdu
,
English
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada