विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
नोवेल कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी अकार्यक्षम विषाणू पासून प्रतिजैविक विकसित करण्याचा संशोधकांचा प्रयत्न
Posted On:
16 APR 2020 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 एप्रिल 2020
सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजिच्या (सीसीएमबी) संशोधकांनी नोवेल कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी अकार्यक्षम विषाणू पासून प्रतिजैविक विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी प्रतिजैविके त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभ उत्पादनासाठी ओळखली जातात.
जगभरातील विविध संस्था या विषाणुवर लस शोधण्याच्या दिशेने काम करीत आहेत आणि जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सध्या ही लस विकसित करणाऱ्या 42 हून अधिक आशावादी संशोधकांची यादी केली आहे.
या प्रक्रियेत क्रियाशील विषाणू मोठ्या संख्येने वाढविला जातो आणि नंतर एकतर रासायनिक किंवा उष्णतेने मारला जातो. जरी रोगजंतू ठार झाला किंवा त्याने पुनरुत्पादन क्षमता गमावली असली तरीही या विषाणूचे विविध भाग अखंड असतात. उदाहरणार्थ स्पाइक प्रोटीन ज्याद्वारे तो पेशींमध्ये प्रवेश करतो. रोगप्रतिकारक शक्तीद्वारे ओळखले जाणारे प्रतिजनुक (रासायनिक रचना) यात सुटे झालेले असतात. जेव्हा हा मृत सूक्ष्मजंतू शरीरात सोडला जातो तेव्हा हा रोगजनक निरुपद्रवी आहे हे न जाणता माणसाची रोगप्रतिकारक शक्ती प्रतिपिंडे तयार करून प्रतिसाद देते. पोलिओ आणि रेबीज रोगांची प्रतिजैविके अशाच प्रकारे तयार केली गेली आहेत.
रोगजनुक मृत झाल्यामुळे हे पुनरुत्पादित होऊ शकत नाही किंवा अगदी सौम्य आजारही होऊ शकत नाही. त्यामुळे कमी प्रतिकारशक्ती असणार्या वृद्ध लोकांनादेखील ही लस देणे सुरक्षित आहे.
“जर आपण मोठ्या प्रमाणात विषाणू वाढविला आणि आपण त्याला निष्क्रिय करू शकलो तर त्याचा उपयोग लस टोचण्यासाठीचे साधन म्हणून होऊ शकतो. आता विषाणू सक्रिय होणार नाही परंतु मानवी शरीर विषाणूची प्रथिने ओळखेल आणि त्याविरूद्ध अँटीबॉडी (प्रतिद्रव्य) तयार करण्यास सुरवात करेल. म्हणून, ते निष्क्रिय विषाणू लस म्हणून काम करते, ”असे सीसीएमबीचे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी इंडिया सायन्स वायरशी बोलताना सांगितले. एकदा कोशिकीय निर्मिती आधारित विषाणूचे उत्पादन झाल्यावर ते उद्योग भागीदाराकडे दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
मानवी शरीराबाहेर विषाणूचे संवर्धन करणे हे महत्त्वाचे तांत्रिक आव्हान आहे. कोरोना विषाणु मानवी पेशींच्या जीवनामध्ये विकसित झाली आहे, विशेषत: सक्रिय ACE2 रिसेप्टर्स असलेल्या पेशींमध्ये. त्याचा योग्य स्रोत मानवी शरीराच्या बाहेरील विषाणूंद्वारे शोधणे ही या तंत्रज्ञानाची गुरुकिल्ली आहे. सीटीएमबी कृत्रिमरित्या विषाणू निर्मिती करून तो वाढविण्यासाठी पेट्री डिशमध्ये वाढलेल्या आफ्रिकन हिरव्या माकडातील एपिथेलियल सेल लाइन वापरत आहे. कोरोना विषाणू कोठे निर्माण होतो, वाढतो, अगणित प्रमाणात वाढतो हे समजून घेण्यासाठी पेशीच्या आणखीन अनेक पर्यायांचा शोध लावला जाईल. पेशींचे निरीक्षण केले जाईल आणि पेशी मरण्यासह आणि विषाणूंपासून मुक्त होण्यासह पेशी बदल दर्शवित असल्यास, ही सकारात्मक बाब आहे. डॉ. मिश्रा म्हणाले, “आम्ही पेशी वाढवत आहोत जे विषाणूच्या अकार्यक्षम रूपानां आश्रय देतील जेणेकरून आम्ही इन-विट्रो सिस्टम बनवू शकू ज्याची संभाव्यता तपासता येईल.” डॉ. मिश्रा म्हणाले. त्यानंतर कोरोना विषाणू निष्क्रिय करण्याची लस विकसित केली जाईल.
एकदा नोवेल कोरोना विषाणूची योग्य पेशी तंत्रज्ञान विकसित झाले कि ते औषधांच्या विकासातही मदतगार ठरेल. एकदा विषाणू पेशीत संक्रमित झाला कि संभाव्य व्यक्तीवर त्याची चाचणी केली जाऊ शकते.
“जर आपण विषाणूने ताजी पेशी संक्रमित केली तर 2-3 दिवसानंतर पेशी मृत होतील आणि बरेचसे विषाणू तयार होतील. तथापि, जर तुम्ही संभाव्य औषध दिले तर सेल मरणार नाही आणि औषध प्रभावी असल्यास विषाणूची संख्या वाढणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारे, एखादे औषध अँटीवायरल म्हणून प्रभावी आहे की नाही ते तपासता येते.
या व्यतिरिक्त, सीसीएमबी नमुने तयार करेल आणि विषाणूचा संसर्ग असणा-या संशयितांची मोठ्या संख्येने चाचणी घेण्यासाठी त्या सुविधांचा उपयोग करेल.
(DST-(India Science Wire))
G.Chippalkatti/V.Joshi/D.Rane
(Release ID: 1615200)