ऊर्जा मंत्रालय

केंद्रीय सार्वजनिक क्षेञ अंतर्गत अर्थात CPSI च्‍या राष्ट्रीय औष्णीक उर्जा महामंडळ अर्थात NTPC ची सर्व 45 रुग्णालये/आरोग्य केंद्रे कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी सज्ज


168 विलगीकरण खाटा तयार; अजून 122 उपलब्ध करुन देण्यासाठी जोरदार तयारी

Posted On: 16 APR 2020 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 एप्रिल 2020


केंद्रीय उर्जा आणि नवीकरणीय उर्जा मंत्री आर.के.सिंग यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत एनटीपीसी (राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ) वीजपुरवठ्यात खंड न पडू देण्यासोबतच त्यांच्या सुविधा आणि सीएसआर निधीच्या योग्य उपयोजनाद्वारे कोविड-19 प्रकोपाविरुद्धच्य़ा लढ्यात आपला वाटा उचलत आहे.

एनटीपीसीने त्यांची 45 रुग्णालये/आरोग्यकेंद्रे विलगीकरण सुविधा पुरवण्यासाठी दिली आहेत, तसेच COVID-19च्या केसेस  योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी विलगीकरण सुविधा आणि वैद्यकिय  कर्मचाऱ्यांना योग्य उपकरणांचा पुरवठा केला आहे.   रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये मिळून प्राणवायू पुरवठ्याच्या सुविधेसह  एकूण 168 खाटा तयार आहेत, त्याशिवाय गरजेनुसार आणखी 122 खाटा उपलब्ध  करण्यात येऊ शकतात.

दिल्लीतल्या बर्दापूर आणि ओदिशात सुंदरगढ या दोन ठिकाणी कोविड-19 साठीचे एक रुग्णालय राज्यसरकारकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

अद्ययावत वैद्यकीय उपकरणांसाठी 3 कोटी उपलब्ध करुन देण्यात आले असुन एनटीपीसी रुग्णालयांमध्ये 7 व्हेंटिलेटर्स, व्हेंटिलेटर्ससह 18 अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध आहेत तर अन्य विविध रुग्णालयांसाठी 18 व्हेंटिलेटर्स आणि 520 IR तापमापके मागवली आहेत.

एनटीपीसीने त्यांच्या मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांना MOHFV ची तपासणी, उपचार आणि हाताळणीसंदर्भात दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांशी अवगत केले आहे. तसेच स्वसंरक्षण उपकरण (पीपीई) वापरण्यासंबधी विडीयोकॉलद्वारे मार्गदर्शन घेण्यात आले आहे. 1200 पीपीई-संच, 1,20,000 सर्जिकल मास्क, 33,000 पेक्षा जास्त ग्लोव्ह्ज, 5000 एप्रन्स, 8000 शू-कव्हर्स, आणि 535 ली सॅनिटायझर्स एवढी सामग्री सर्व ठिकठिकाणच्या प्रकल्प व आरोग्यकेंद्रांमध्ये पोचवण्यात आली आहे.

 

यासाठी आतापर्यंत 3.50 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

मदतीच्या कक्षा विस्तारत, NTPCने ओदिशा राज्यातल्या भद्रक येथील 120-खाटांच्या  सालंदी रुग्णालयाच्या कोविड-19 विशेष रुग्णालय म्हणून वापरासाठी दरमहा 35 लाख रुपयांचे भाडे चुकवण्यासाठीचे  आर्थिक सहाय्य देत तेथील कर्मचाऱ्यांच्या राहण्या-जेवण्याच्या खर्चाचा भार उचलला आहे. कोविड-केअर  केंद्रासाठीची ही तरतूद तीन महिन्यांसाठी असून त्यासाठी 1.05 कोटींची तरतूद केली आहे. 

याशिवाय, एनटीपीसीने वैद्यकिय सुविधा आणि पीपीई पुरवठ्यासाठी  6.36 कोटी  जिल्हा व्यवस्थापन आणि स्थानिक व्यवस्थापनाला सुपूर्द केले आहेत. आतापर्यंत, रिहंदने दारिद्रयरेषेखालील नागरिकांसाठी 17 लाख रुपये किंमतीच्या 2,800 धान्य गोण्या आणि खाद्यपदार्थ पाकिटे एवढी सामग्री जिल्हा व्यवस्थापनाकडे सोपवली आहे. तर, भारतीय रेड क्रॉस सोसायटी, सिंग्रौलीकडे या कामांसाठी 25 लाख रुपयांचा निधी सुपूर्द केला आहे. 

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात सीएसआर निधी वापरण्याच्या भारतीय सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत एनटीपीसीने 250 कोटी रुपये तसेच कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन-योगदानाचे 7.50 कोटी रुपये पीएम-केअर्स निधीत जमा केले आहेत. 

 

 

B.Gokhale/V.Sahajrao/D.Rane



(Release ID: 1615071) Visitor Counter : 203