कृषी मंत्रालय
लॉकडाऊनच्या काळात नाशवंत वस्तूंची आंतरराज्यीय वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते अखिल भारतीय कृषी वाहतूक कॉल सेंटर नंबर्स 18001804200 आणि 14488 चे उद्घाटन
Posted On:
15 APR 2020 3:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 एप्रिल 2020
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री, नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते नवी दिल्लीत कृषी भवन इथे आज अखिल भारतीय कृषी वाहतूक सेंटरचे उद्घाटन झाले. कोविड19 च्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरु असतांना, नाशवंत कृषी उत्पादनांच्या आंतरराज्यीय वाहतुकीत काही अडथळे किंवा समस्या आल्यास, त्या सोडवण्यासाठी 18001804200 आणि 14488 हे दोन संपर्क क्रमांक यावेळी सुरु करण्यात आले. कोणत्याही मोबाईल अथवा दूरध्वनीवरुन 24 तास या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
राज्याराज्यांमध्ये नाशवंत कृषीमाल म्हणजे भाज्या आणि फळे, कृषी उत्पादने, जसे की बियाणे, खते आणि कीटकनाशके यांची वाहतूक सुरळीत व्हावी या हेतूने कृषी मंत्रालयाने ही 24 तास हेल्पलाईन सुरु केली आहे.
मालाची वाहतूक करणारे ट्रकचालक, व्यापारी, किरकोळ व्यापारी, वाहतूकदार, शेतकरी, उत्पादक किंवा इतर कोणीही हितसंबंधी व्यक्ती ज्यांना काही अडचणी अथवा समस्या असल्यास, या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. या संपर्क कक्षात असलेले अधिकारी आपली समस्या आणि वाहनाची माहिती संबंधित राज्य सरकारांकडे पाठवतील जेणेकरुन स्थानिक प्रशासन त्यांची समस्या सोडवू शकतील.
हरयाणातील फरीदाबाद इथली इफ्को किसान समाचार लिमिटेड ही कंपनी हे कॉल सेंटर चालवणार आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
U.Ujgare/R.Aghor/P.Malandkar
(Release ID: 1614685)
Visitor Counter : 227
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam