श्रम आणि रोजगार मंत्रालय

कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) ईएसआय योगदान दाखल करण्यासाठी कालावधी वाढविला


लॉकडाऊन दरम्यान परवानगी असलेल्या खाजगी केमिस्टकडून औषध खरेदीसाठी लाभ

Posted On: 14 APR 2020 8:10PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2020

 

कोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर देशाला अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. बर्‍याच आस्थापना तात्पुरत्या बंद असून कामगार काम करण्यास असमर्थ आहेत. शासनाने व्यापारी संस्था आणि कामगारांपर्यंत पोहोचविलेल्या मदत उपायांच्या अनुषंगाने कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी)  वैद्यकीय संसाधने बळकट करण्याबरोबरच त्याच्या भागधारकांसाठी विशेषत: नियोक्ते आणि विमाधारकांसाठी मदत उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

मदत उपाय म्हणून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ईएसआय योगदान भरण्यासाठीचा कालावधी अनुक्रमे 15 एप्रिल आणि 15 मेपर्यंत वाढविण्यात आला होता. आता मालकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करता फेब्रुवारी महिन्यात ईएसआय योगदान भरण्याची मुदत पूर्वीच्या वाढीव कालावधीपेक्षा म्हणजे 15 एप्रिलवरून 15 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. मार्च 2020 महिन्यात योगदान भरण्याची असलेली मुदतसुद्धा 15 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. वाढीव कालावधीत आस्थापनांवर कोणताही दंड किंवा व्याज किंवा नुकसान भरपाई आकारली जाणार नाही.  3.49 कोटी विमा उतरवलेल्या व्यक्ती (आयपी) आणि 12,11,174 मालकांना विवरण भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने  दिलासा मिळणार आहे.

या व्यतिरिक्त, विमा उतरवलेल्या व्यक्ती आणि लाभार्थींसाठी खालील मदत उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

ईएसआय लाभार्थींची अडचण कमी करण्यासाठी, लॉकडाऊन कालावधीत खाजगी केमिस्टकडून ईएसआय लाभार्थ्यांनी औषधे खरेदी करायला आणि त्यानंतर लगेचच ईएसआयसीद्वारे परतफेड करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

 जर कोरोना संशयास्पद / पुष्टी झालेल्या प्रकरणांची पूर्तता करण्यासाठी एखाद्या ईएसआयसी रुग्णालयाला कोविड-19 साठीच्या उपचारासाठीचे  रुग्णालय म्हणून घोषित केले गेले तर विमा उतरवलेल्या व्यक्ती आणि टाय-अप केलेल्या रुग्णालयाच्या लाभार्थ्यांना वैद्यकीय सेवा देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. ईएसआय लाभार्थ्यांना विहित दुय्यम / एसएसटी सल्लामसलत / प्रवेश / तपासणी प्रदान करण्यासाठी संबंधित रुग्णालयांकडे संदर्भित केले जाऊ शकते ज्या कालावधीत संबंधित ईएसआयसी रुग्णालय  कोविड-19 च्या उपचारांसाठीचे विशेष रुग्णालय म्हणून काम करते. ईएसआय लाभार्थी हे टाय अप केलेल्या रुग्णालयातून थेट संदर्भ पत्र न घेता त्यांच्या हक्कानुसार आपत्कालीन परिस्थितीत किंवा आपत्कालीन परिस्थिती नसतानाही वैद्यकीय सेवा घेऊ शकतात.

कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या आणि सेवानिवृत्त विमाधारकांना, नियम 60-61 च्या अंतर्गत दहा रुपये प्रति महिना दराने एक वर्ष आगाऊ एकरकमी देयकासाठी वैद्यकीय लाभ देण्यात येतो. लॉकडाऊनच्या सध्याच्या परिस्थितीत असे काही प्रकरण उद्भवू शकतात की या लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या वैद्यकीय लाभ कार्डांची वैधता कालबाह्य होईल कारण लॉकडाऊनमुळे हे लाभार्थी अग्रिम वार्षिक एकरकमी रक्कम जमा करण्यास असमर्थ आहेत.अशा लाभार्थ्यांना ईएसआय (केंद्रीय नियम) च्या नियम 6061 अंतर्गत 30.जुन2020 पर्यंत वैद्यकीय लाभ घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

स्थायी अपंगत्व लाभ आणि अवलंबित लाभार्थींच्या बाबतीत 41 कोटी (अंदाजे) रुपये मार्च 2020 मध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत.

                                                                        ****

B.Gokhale/ V.Joshi/P.Kor


(Release ID: 1614501) Visitor Counter : 248