कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर डॉ. जितेंद्र सिंग यांनी डीओपीटी, डीएआरपीजी आणि डीओपीपीडब्ल्यू विभागांच्या कामाचा घेतला आढावा
12 दिवसांत कोविड-19विषयी आलेल्या 7000 पेक्षा जास्त तक्रारींचा निपटारा- डॉ. सिंग
आय- जीओटीच्या ‘से-लर्निंग’ माध्यमातून प्रशिक्षण घेण्यासाठी 71हजारपेक्षा जास्त व्यक्तींकडून नावनोंदणी
Posted On:
13 APR 2020 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2020
ईशान्य क्षेत्र विकास खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री आणि कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्री अणू ऊर्जा आणि अंतराळ विभागाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी आज कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आपल्या खात्यांच्या कामाचा आढावा घेणारी एक बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतली. यावेळी डीओपीटी म्हणजेच कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, डीएआरपीजी म्हणजेच प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण, तसेच डीओपीपीडब्ल्यू म्हणजेच निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग या खात्यांच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाशी संवाद साधला. देशभरामध्ये आलेल्या कोविड-19 महामारीविरुद्ध लढा देण्यासाठी या तीनही विभागांनी केलेल्या कामाचा आढावा यावेळी डॉ. सिंग यांनी घेतला. या काळामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाला कोणताही त्रास होवू नये, याची सर्वतोपरी दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
कोरोनासंबंधी येत असलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेता यावी, आणि त्यावर देखरेख ठेवता यावी यासाठी डॉ. सिंग यांनी आपल्या खात्याचे https://darpg.gov.in. पोर्टल आणि ‘डॅशबोर्ड’ तयार केला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून येणा-या प्रत्येक तक्रारीची दखल घेण्याबाबत सर्व केंद्रीय मंत्रालये, संबंधित विभाग आणि सर्व राज्ये यांना परिपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. या विभागाकडे आलेल्या तक्रारींचा दैनंदिन अहवाल दि. 1एप्रिल,2020 पासून कोविड-19 साठी तयार करण्यात आलेल्या अधिकारप्राप्त समूह-10 कडे तसे पंतप्रधान कार्यालयाकडे सादर करण्यात येत आहे, असं यावेळी सांगण्यात आलं.
पहिल्या 12 दिवसांमध्ये या पोर्टलच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या कोविड-19 विषयीच्या सात हजार तक्रारींची दखल सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्यावतीने घेण्यात आली. सरकारने सरासरी 1.57 दिवसांत आलेल्या तक्रारीचे निवारण केले. आलेल्या तक्रारींमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या 1625 तक्रारी, वित्त मंत्रालयाच्या 1043 तक्रारी, कामगार मंत्रालयाच्या 751 तक्रारी होत्या. दि. 8 आणि 9 एप्रिल, 2020 रोजी सर्वात जास्त म्हणजे 1315 तक्रारींचे निवारण या विभागाने केले.
कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या ‘से-लर्निंग’ च्या माध्यमातून ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यासाठी जवळपास 71हजारपेक्षा जास्त व्यक्तींकडून नावनोंदणी केली आहे. याबद्दल डॉ. जितेंद्र सिंग यांनी समाधान व्यक्त केले. कोविड-19 विरोधात कसा लढा द्यायचा यासाठी गेल्या आठवड्यात सुरू केलेल्या या ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यसक्रमाचा लाभ आत्तापर्यंत 27 हजार उमेदवारांनी घेतला आहे. यामध्ये डॉक्टर्स, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, वैद्यकीय तंत्रज्ञ, वैद्यक व्यवसायाला पूरक कार्य करणारे परिचारक, वैद्यक सेवा कर्मचारी, एएनएम्स, केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकारी, नागरी सुरक्षा अधिकारी, विविध पोलिस संघटना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटना, राष्ट्रीस सेवा योजना, रेडक्रॉस सोसायटी, भारत स्काउट आणि गाइड आणि इतर स्वयंसेवक यांचा समावेश आहे.
या माध्यमातून प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार साधन निवडून त्याव्दारे हे प्रशिक्षण घेता येते. लोकसंख्येचा विचार करून हा ऑनलाइन अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यासाठी लागणा-या सामुग्रीचेही वितरण केले जात आहे. या माध्यमातून सुमारे 1.50 कोटी कामगार आणि स्वयंसेवकांना प्रदान करण्यात येणार आहे. ‘आयजीओटी’च्या माध्यमातून वेगवेगळ्या नऊ अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये कोविड, अति दक्षता विभाग, व्हँटिलेशन व्यवस्थापन, क्लिनिकल व्यवस्थापन, पीपीईच्या माध्यमातून संक्रमण बचाव, संक्रमण नियंत्रण आणि बचाव, विलगीकरण आणि अलग करणे, प्रयोगशाळेसाठी नमुना संकलन आणि चाचणी, कोविड-19 रुग्णांचे व्यवस्थापन, कोविड-19 प्रशिक्षण देण्यात येत आहे.
B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
(Release ID: 1614071)
Visitor Counter : 163