संरक्षण मंत्रालय
कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत भारतीय वायू दलाचे पाठबळ
Posted On:
11 APR 2020 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2020
नवीन कोरोना विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी भारत सरकार अविरत प्रयत्न करत असुन कोणतेही काम हाती घेण्यासाठी भारतीय वायू दल (आयएएफ) निरंतर 24 तास सज्ज आहे. सर्व राज्यांच्या प्रमुख ठिकाणांपर्यंत अत्यावश्यक औषधे आणि अन्नधान्य वेळेवर वितरीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, ज्यायोगे राज्य सरकारे आणि सहाय्यक संस्थांना परीणामकाररित्या आणि कार्यक्षमतेने या आजाराचा सामना करण्यासाठी सुसज्ज केले जाईल.
मागील काही दिवसांमध्ये आयएएफने महारष्ट्रा, केरळ, तेलंगणा, नागालँड आणि जम्मू-काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांसह संपूर्ण देशभरातील विविध राज्यांमध्ये प्रमुख ठिकाणी अत्यावश्यक औषधे आणि वस्तू विमानाने पोहोचवल्या आहेत.
भारतीय वायू दलाने डीआरडीओसाठी काही समर्पित उड्डाणे केली आहेत आणि डीआरडीओच्या उत्पादन सुविधा केंद्रांवर पीपीई सूटच्या उत्पादनासाठी विविध प्रमुख ठिकाणांवरून 9000 किलो आवश्यक कच्चा माल विमानाने वितरीत केला आहे. तसेच डीआरडीओद्वारे निर्मित N95/99 मास्कची देखील विमानाद्वारे वाहतूक करण्यात आली. दरम्यान, ही सगळी कार्ये करताना रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून भारत सरकार द्वारे निर्दिष्ट केलेली सर्व काळजी घेतली जात आहे याबद्दल आयएएफने खात्री दिली आहे.
या महामारीमुळे देशभरात उद्भवलेल्या परिस्थिती विरुद्धच्या लढाईला पाठिंबा देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गरजांची पूर्तता करण्यासाठी आयएएफ सदैव तयार आहे.
छायाचित्र : डीआरडीओ च्या उत्पादन सुविधा केंद्रांवर वैयक्तिक सुरक्षा उपकरणे (पीपीई) तयार करण्यासाठी आवश्यक कच्चा माल आयएएफ च्या An-32 विमानात लोड करत आहेत.
B.Gokhale/S.Mhatre/P.Kor
(Release ID: 1613426)
Visitor Counter : 210