नागरी उड्डाण मंत्रालय

कोविड-19 संसर्ग नियंत्रणासाठी खासगी विमान कंपन्यांनी केली सुमारे 2,675 टन वैद्यकीय सामानाची देशांतर्गत वाहतूक


अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी जीवनवाहिनी उडान सेवेतील 180 पेक्षा जास्त विमानांनी केला 1,66,000 किलोमीटर्सचा प्रवास

Posted On: 10 APR 2020 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 एप्रिल 2020

 

कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात लागू केलेल्या संपूर्ण संचारबंदीदरम्यान देशातील जीवनवाहिनी उडान सेवेअंतर्गत 180 पेक्षा जास्त विमानफेऱ्या केल्या गेल्या. त्यापैकी 114 विमानांचे कार्यान्वयन एयर इंडिया आणि अलायंस एयर यांनी केले तर भारतीय हवाई दलाच्या 58 विमानांनी या सेवेत सहभाग घेतला. या सर्व विमानांनी एकूण 1,66,076 किलोमीटरचा प्रवास करून कालपर्यंत सुमारे 258 टन अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याची वाहतूक केली. 

देशांतर्गत मालवाहतूक करणाऱ्या ब्लू डार्ट, स्पाईस जेटआणि इंडिगो या खासगी विमान कंपन्या व्यावसायिक तत्वावर मालवाहतूक करण्यासाठी विमानोड्डाण करीत आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या विमानांनी देशांतर्गत विमानसेवेद्वारे आतापर्यंत सुमारे 2,675 टन वैद्यकीय सामानाची वाहतूक केली आहे. तर पवन हंस या विमान कंपनीने बुधवार पर्यंत 5 मालवाहतूक विमानांद्वारे देशात गुवाहाटी, आगरताळा, किश्वर, नवापाची, श्रीनगर, जम्मू, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी 1.07 टन वैद्यकीय सामान पोहोचविले आहे.

या सर्व विमानांच्या मालवाहतुकीद्वारे रसायने, संप्रेरके, वैद्यकीय उपकरणे, चाचणी कीट, वैयक्तिक संरक्षणाची साधने, मास्क, हातमोजे आणि इतर आवश्यक साधने असे अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांनी मागविलेल्या सामानाचा समावेश आहे.

एयर इंडियाच्या विमानाने काल शांघायहून 21.77 टन वैद्यकीय उपकरणे देशात आणली. यापुढे भविष्यात गरज पडेल त्याप्रमाणे परदेशांमधून वैद्यकीय साहित्य आणण्यासाठी एयर इंडियाने अनेक विमाने तैनात ठेवली आहेत.

 


B.Gokhale/ S.Chitnis/D.Rane
 


(Release ID: 1613147) Visitor Counter : 160