विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड-19 वर मात करण्यासाठी डीएसटीने नैसर्गिक अल्कोहोल मुक्त सॅनिटायझरच्या उत्पादनासाठी स्टार्टअपला आर्थिक पाठबळ दिले

Posted On: 10 APR 2020 2:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 एप्रिल 2020

 

महाराष्ट्रातील पुणे स्थित विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) अन्न, कृषी आणि जैव-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रीन पिरामिड बायोटेक (जीपीबी) या कंपनीला दीर्घकाळ टिकणाऱ्या विषाणू आणि जीवाणू प्रतिबंधक, हात आणि पृष्ठभागावर प्रभावी ठरणाऱ्या नैसर्गिक अल्कोहोल मुक्त सॅनिटायझरच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य दिले आहे. 

कोविड-19 विरुद्धच्या भारतातील लढाईत हे खूपच परिणामकारक ठरेल. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे हात तसेच टेबल, संगणक, खुर्च्या, मोबाईल फोन आणि कुलूप यासारख्या अनेकांकडून हाताळल्या जाणाऱ्या वस्तूंची स्वच्छता करून या रोगाच्या प्रसाराला आळा घालणे आवश्यक आहे. साबण किंवा अल्कोहोलच्या वापराने या विषाणूवर असलेला पातळ पापुद्रा नष्ट होतो परंतु साबण आणि पाण्याची सद्य उपलब्धता हे एक आव्हान आहे. अल्कोहोल मिश्रित पाण्याची उपलब्धता आणि वापर हे देखील कठीण आहे.

ग्रीन पिरामिड बायोटेकने विकसित केलेल्या सॅनिटायझरचा ‘जैव आद्रक’ (bio surfactant) हा क्रियाशील औषधीय घटक (एपीआय) आहे जो जीवाणू आणि विषाणूंपासून दीर्घकाळ संरक्षण प्रदान करतो तसेच संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी हा एक पर्याय ठरू शकतो. रोगजनक जीवाणू, बुरशी आणि यीस्टच्या अनेक प्रकारांवर याची चाचणी केली आहे. हे मिश्रण हात आणि पृष्ठभाग स्वच्छ करण्याचा सोयीस्कर आणि प्रभावी मार्ग प्रदान करू शकते तसेच हे संपूर्णतः जैविकरित्या नष्ट होणारे, नैसर्गिक आणि अल्कोहोल-मुक्त आहे. सॅनिटायझेशन व्यतिरिक्त, एपीआयकडे फायब्रोब्लास्ट क्रियेला पूरक असा एक अद्वितीय गुण आहे. म्हणून हे जखमेच्या स्वच्छतेसाठी वापरले जाऊ शकते आणि त्वचेचा कोरडेपणा आणि जळजळ होण्यापासून प्रतिबंधित करते. तसेच हे उत्पादन त्वचेसाठी हानिकारक नाही.


"त्वचेचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत - साबण आणि पाणी, अल्कोहोल आधारित मिश्रण, इत्यादी त्यापैकी प्रत्येकाची उपलब्धता, संदर्भ आणि परिस्थिती यावर त्याची ताकद आणि वापर अवलंबून आहे. जैव आद्रक आधारित जंतुनाशक मिश्रण हे जैविकरित्या नष्ट होणारे, पर्यावरण पूरक आणि त्वचेला अपाय न करणारे आहे.” असे डीएसटी चे सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा यांनी सांगितले.

(अधिक माहितीसाठी संपर्क:

डॉ. अस्मिता प्रभुणे (संस्थापक संचालक) ग्रीन पिरामिड बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड, एनसीए

asmita.prabhune[at]gmail[dot]com 

मोबाईल: 9822244149.)

 

 

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane



(Release ID: 1612881) Visitor Counter : 186