कंपनी व्यवहार मंत्रालय
भारतीय लेखापरीक्षक संस्था, भारतीय कंपनी सचिव संस्था आणि भारतीय लेखा परीव्यय संस्था यांनी कोव्हिड-19 चा मुकाबला करण्यासाठी पीएम केअर्स फंडाला दिले 28 कोटी 80 लाख रुपये
Posted On:
10 APR 2020 1:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2020
केंद्र सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या, भारतीय लेखापरीक्षक संस्था, भारतीय कंपनी सचिव संस्था, तसेच भारतीय लेखापरीव्यय संस्था या तीनही व्यावसायिक संस्थांनी पुढे येऊन पीएम केअर्स या फंडाला कोविड-19 महामारीचा मुकाबला करण्यासाठी 28 कोटी 80 लाख रुपयांचा निधी सुपूर्द केला आहे.
28 मार्च 2020 रोजी कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी प्रधानमंत्री आपत्कालीन नागरीक सहायता आणि मदत निधी म्हणजेच पीएम केअर्स फंडाची स्थापना करण्यात आली होती. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आपत्तीच्या काळात संकटग्रस्त नागरिकांना मदत करण्याच्या उद्दिष्टाने पीएम केअर्स फंडाची स्थापना करण्यात आली होती.
याबाबत तपशीलवार माहिती…..…
(रुपये कोटी प्रमाणे)
अनुक्रमांक
|
संघटनेचे नाव
|
संस्थेचा हिस्सा
|
सदस्यांचा हिस्सा
|
एकूण
|
1
|
भारतीय लेखापरीक्षण संस्था
|
15
|
6
|
21
|
2
|
भारतीय कंपनी सचिव संस्था
|
5
|
0.25
|
5.25
|
3
|
भारतीय लेखापरीव्यय संस्था
|
2.50
|
0.05
|
2.55
|
एकूण
|
|
22.50
|
6.30
|
28.80
|
|
|
|
|
|
U.Ujgare/S.Patgaonkar/D.Rane
(Release ID: 1612868)
Visitor Counter : 130