पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युगांडाच्या राष्ट्रपतींसमवेत दूरध्वनीवरून साधला संवाद

Posted On: 09 APR 2020 7:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युगांडाचे  राष्ट्रपती  योवेरी कागुटा मुसेवेनी  यांच्या समवेत दूरध्वनीवरून संवाद साधला.

कोविड-19 महामारीमुळे उद्‌भवलेल्या आरोग्य आणि आर्थिक आव्हानांबाबत या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.सध्याच्या आरोग्य संकटात, भारत, आफ्रिका खंडातल्या या आपल्या मित्रासमवेत असून,या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी,युगांडा सरकारला, भारत, सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

सध्याच्या परिस्थितीत तसेच इतर काळातही, युगांडामधल्या भारतीय समुदायाची, तिथले सरकार आणि समाज घेत असलेली काळजी आणि सद्‌भावनेची, पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी, जुलै 2018 मधल्या आपल्या युगांडा भेटीचे स्मरण केले आणि भारत-युगांडा यांच्यातल्या  विशेष  संबंधांचा उल्लेख केला.

कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आव्हानावर जग लवकरच मात करेल, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. 

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 



(Release ID: 1612642) Visitor Counter : 134