पंतप्रधान कार्यालय

भारत -अमेरिका भागीदारी पूर्वीपेक्षाही अधिक बळकट असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

Posted On: 09 APR 2020 11:51AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2020

  भारत -अमेरिका भागीदारी पूर्वीपेक्षाही अधिक बळकट  असल्याचे  प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

कोविड-19 विरुद्धच्या लढाईत अमेरिकेला हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा करण्याचा  निर्णय घेतल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

त्यांच्या ट्विटर संदेशाला  उत्तर  देतांना पंतप्रधान म्हणाले की, ''हा काळ असा आहे ज्याने मित्रांमधले बंध अधिक दृढ केले आहेत. भारत अमेरिका भागीदारी पूर्वीपेक्षाही अधिक बळकट आहे.

मानवजातीसाठी भारत शक्य असेल ते सर्व काही करेल.''

Fully agree with you President @realDonaldTrump. Times like these bring friends closer. The India-US partnership is stronger than ever.

India shall do everything possible to help humanity's fight against COVID-19.

We shall win this together. https://t.co/0U2xsZNexE

— Narendra Modi (@narendramodi) April 9, 2020

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar



(Release ID: 1612445) Visitor Counter : 259