आदिवासी विकास मंत्रालय

आदिवासी जमातींना त्यांचे काम सुरक्षीतपणे करता यावे यासाठी बचत गटांकरिता ट्रायफेड युनिसेफच्या सहकार्याने डिजिटल मोहीम राबवणार


मोहिमेच्या प्रचारासाठी उद्या वेबिनारचे आयोजन

Posted On: 08 APR 2020 8:45PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 एप्रिल 2020

 

आदिवासी जमातींना त्यांचे काम सुरक्षितपणे करता यावे यासाठी डिजिटल मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी या कामात सहभागी बचत गटांसाठी  ट्रायफेडने युनिसेफच्या सहकार्याने डिजिटल संवाद धोरण विकसित केले आहे. सामाजिक अंतराचे  महत्त्व अधोरेखित करत युनिसेफ बचत गटांना डिजिटल मल्टीमीडिया सामग्री, व्हर्च्युअल प्रशिक्षणासाठी वेबिनार (कोविड बाबत मूलभूत ओळख , प्रमुख प्रतिबंधात्मक उपाय), सोशल मीडिया मोहिम (सामाजिक अंतर, घरात विलगीकरण इत्यादी)आणि वन्य रेडिओ.स्वरूपात  प्रसारित करण्यासाठी आवश्यक मदत पुरवेल.  याशिवाय, आदिवासी समुदायाच्या अस्तित्वासाठी त्यांना आवश्यक अन्न आणि शिधा पुरवण्यासाठी ट्रायफेडने   स्टँड विथ ट्रायबल फॅमिलीज उपक्रमाबरोबरच आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या #iSandWithHumanity उपक्रमाची मदत घेतली आहे.

या मोहिमेच्या प्रचारासाठी उद्या 9 एप्रिल  2020  रोजी वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. 18,000  हून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे आणि सर्व 27 राज्यांमधील आदिवासी प्रदेशांचा यात समावेश असेल.

सुमारे 18,075  वन-धन बचत गटांसह 27 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशात एकूण 1205 वन धन विकास केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.  या योजनेत 3.6 लाखांहून अधिक आदिवासी लोकांचा समावेश आहे. सुरुवातीला, यापैकी 15,000 बचत गटांना डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे वन धन सामाजिक अंतर जनजागृती आणि उपजीविका केंद्र म्हणून प्रोत्साहन दिले जाईल. हे बचत गट सामाजिक अंतर आणि सूचनांच्या पालनाबाबत समुदायामध्ये जनजागृती करतील.  कोविड -19  दरम्यान एनटीएफपीशी संबंधित काय करावे? आणि काय करू नये हे  लक्षात ठेवणे, वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी उपाय सुचवणे , रोकडरहित व्यवहारांचा अवलंब करणे यासह अन्य  सूचना सांगितल्या जातील.

****

B.Gokhale/S.Kane/P.Kor


(Release ID: 1612363) Visitor Counter : 150