शिक्षण मंत्रालय

कोविड 2019 चा मुकाबला करण्यासाठी तसेच भविष्यातील त्याचे विपरीत परिणाम रोखण्यासाठी मनुष्यबळ मंत्रालयाने जाहीर केली, "समाधान" चाचणी


"समाधान" चाचणीसाठी प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख 14 एप्रिल 2020

Posted On: 07 APR 2020 5:41PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2020

 

मनुष्यबळ मंत्रालयाचा नव उद्यमी विभाग आणि भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद, तसंच फोर्ज उद्योग आणि इनोव्हेशिओक्यूरीस यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना आव्हान देण्यासाठी  आँनलाईन चाचणी जाहीर केली आहे.

या चाचणीद्वारे सरकारी संस्था, आरोग्य सेवा, रुग्णालये यांना कोविड महामारीच्या काळात तसेच आपत्तीच्या काळात वापरता येणाऱ्या सेवांसाठी ,विद्यार्थ्यांनी आपले नाविन्यपूर्ण  संशोधन आणि कल्पना पाठवायच्या आहेत. या कल्पनांचा उपयोग नागरिकांना सूचना देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी तसेच भविष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी काही त्वरित योजना शोधून काढण्यासाठी देखील केला जावु शकेल अशा त्या हव्यात.

     या योजनेद्वारे,पायाभूत सुविधा उपलब्ध करून विद्यार्थी आणि त्यांचे प्रशिक्षक यांना नवीन प्रयोग आणि संशोधन करण्यासाठी  उद्युक्त केले जाईल. या योजनेचे यश यात सहभागी होणारे विद्यार्थी किती जलदगतीशीलतेने ,आपल्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग करून या महामारीचा मुकाबला करण्यासाठी प्रश्नांची उत्तरं शोधतील आणि तिचा वापर उद्योग जगत कशाप्रकारे करेल,, यावर अवलंबून राहील.

या चाचणीत भाग घेण्यासाठीचे अर्ज स्विकारणे 7 एप्रिल 2020 पासून सुरू 14 एप्रिल पर्यंत सुरू राहील. उमेदवारांना 17 एप्रिल 2020 पर्यंत आपले अर्ज स्वीकृ आहेत की नाही, ते कळवले जाईल., अशा उमेदवारांनी आपल्या प्रवेशिका 18  ते 23 एप्रिल 2020 पर्यंत पाठवायच्या असून त्यांचे परीक्षण सदस्यांमार्फत होऊन 25 एप्रिल पर्यंत निर्णय कळवण्यात येतील.

 

G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor



(Release ID: 1612276) Visitor Counter : 211