पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
न्यूयॉर्क येथे कोविडग्रस्त वाघाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने देशभरातल्या प्राणिसंग्रहालयांना दिला अतिदक्षतेचा इशारा
प्रविष्टि तिथि:
06 APR 2020 6:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 एप्रिल 2020
अमेरिकेच्या कृषी खात्याच्या राष्ट्रीय पशु वैद्यकीय सेवा प्रयोगशाळेने 5 एप्रिल 2020 ला जारी केलेल्या निवेदनानुसार प्राणीसंग्रहालय न्यूयॉर्क ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयातील वाघाला SARS-CoV-2 (COVID-19) चा संसर्ग झाल्याचे म्हंटले आहे.
https://wvvw.aphis.usda.gov/aphisinewsroominews/sa_by_date/sa-2020/ny-zoo-covid-19
या पार्श्वभूमीवर पर्यावरण, वने आणि हवामानबदल खात्यांतर्गत येणाऱ्या केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने देशभरातल्या प्राणिसंग्रहालयांना अतिदक्षता बाळगण्याचा इशारा दिला आहे. प्राण्यांवर 24X7 सतत नजर ठेवणे, त्यांच्यातील विचित्र वागणूक, लक्षणे तपासण्यासाठी सीसीटीव्ही, त्यांची काळजी घेणाऱ्या तसेच जवळ असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखणे, शक्यतो व्यक्तिगतसंरक्षण आवरण (पीपीई) वापरणे, प्राणी आजारपणाची लक्षणे दाखवत असल्यास त्यांना वेगळे ठेवून कॉरंन्टाईन करणे आणि प्राण्यांना अन्नपदार्थ देताना कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घेणे अशा तऱ्हेने सावधगिरी पाळण्यास सुचवले आहे.
या सुचना पत्रकानुसार मांसाहारी सस्तन प्राणी विशेषतः मांजर, तरस आणि वानर जातीतील जनावरे यांचेवर काळजीपूर्वक नजर ठेवणे आणि संशयित बाधितांचे नमुने covid-19 तपासणीसाठी नियुक्त प्राणी आरोग्य संस्थांना पंधरवड्याने पाठवणे या सूचना केल्या आहेत. रोग कारक नमुने आवश्यकत्या सुरक्षा उपाययोजनांसह राष्ट्रीय आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे खालील जैव कंटेनमेंट खालील जैव कंटेनमेंटकडे द्यावे.
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ऍनिमल डिसीज- भोपाळ, मध्य प्रदेश
- घोड्यांशी संबंधित राष्ट्रीय संशोधन केंद्र- हिस्सार, हरियाणा
- पशू रोग आणि निवारण संशोधन केंद्र (CADRAD), भारतीय पशुवैद्यक संशोधन संस्था- इझ्झतनगर ,बरेली, उत्तर प्रदेश
नोवेल करोना विषाणू संसर्ग ( covid-19)संदर्भात सरकारने वेळोवेळी दिलेल्या निर्गमित केलेल्या नियमावलींनुसार सर्व प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी संरक्षण आणि निर्जंतुकीकरणासंबंधीचे नियम पाळावेत असे केंद्रीय प्राणिसंग्रहालय अथोरिटीने सुचवले आहे.
याशिवाय, प्राणिसंग्रहालयांनी याबाबतीत सार्वजनिक आरोग्य आणि त्या संबंधीच्या तपासणीसाठी जबाबदार असणाऱ्या तसेच या संदर्भात सर्वेक्षण आणि निदानासाठीचे नमुने केंद्रीय संस्थेला देण्यासाठी नियुक्त सरकारी केंद्रीय प्रातिनिधिक संस्थांशी वेळोवेळी सल्लामसलत करावी अशी सूचना केली आहे.
B.Gokhale/V.Sahajrao/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1611890)
आगंतुक पटल : 236