गृह मंत्रालय

देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनचा सुरळीत आणि अडथळामुक्त पुरवठा कायम राखण्यावर विशेष लक्ष देण्यासाठी गृह मंत्रालयाने राज्यांना लिहिले पत्र

Posted On: 06 APR 2020 5:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 एप्रिल 2020

 

देशात अत्यावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा सुरू ठेवण्याचा एक भाग म्हणून केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून वैद्यकीय ऑक्सिजनचा  सुरळीत आणि अडथळामुक्त  पुरवठा कायम राखण्यावर विशेष लक्ष द्यायला सांगितले आहे. कोविड19 च्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनचा देखील समावेश असल्याने देशात वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा राखण्याची  नितांत गरज आहे यावर या पत्रात भर देण्यात आला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने (एमएचए) देशात कोविड-19 महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेश सरकारचे मंत्रालय/विभाग आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने हाती घ्यावयाच्या लॉकडाउन उपायांसंदर्भात 24.03.2020 रोजी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती आणि 25.03.2020, 26.03.2020, 02.04.2020 आणि 03.04.2020 रोजी त्यात आणखी बदल करण्यात आले होते.

एकत्रित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक कारखाने, त्यांचा कच्चा माल आणि अन्य सामुग्री ; त्यांच्या पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन कारखाने रुग्णालयातील पायाभूत सुविधांचा विस्तार आणि वाढीसाठी आवश्यक वस्तूंची वाहतूक आणि वैद्यकीय पुरवठा आणि संसाधने, कामगार आणि सामुग्रीची जमवाजमव  यांना परवानगी आहे. तसेच  3 एप्रिल, 2020 रोजी सर्व राज्यांना पाठवलेल्या निवेदनात कर्मचार्‍यांच्या आंतरराज्यीय स्थलांतरासह सवलतीच्या  वस्तूंच्या पुरवठा साखळीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी विस्तृत मार्गदर्शक तत्वे  जारी करण्यात आली आहेत.

वरील बाबी लक्षात घेत  गृहसचिवांनी लॉकडाउन उपायांबाबत  एकत्रित मार्गदर्शक तत्त्वांच्या विविध कलमांअंतर्गत काही अपवादात्मक बाबींबाबत पुन्हा स्पष्टीकरण दिले आहे, यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे-

  • मेडिकल ऑक्सिजन गॅस / लिक्विड, मेडिकल ऑक्सिजन सिलिंडर, लिक्विड ऑक्सिजन साठवण्यासाठी क्रायोजेनिक टाक्या, लिक्विड क्रायोजेनिक सिलिंडर्स लिक्विड ऑक्सिजन क्रायोजेनिक ट्रान्सपोर्ट टँक्स, सभोवताली वेपोरायझर्स  आणि क्रायोजेनिक व्हॉल्व्ज , सिलेंडर व्हॉल्व्हज आणि अ‍ॅक्सेसरीजचे सर्व उत्पादन युनिट्स;
  • वरील वस्तूंची वाहतूक;
  • वरील वस्तूंची सीमेपलीकडे वाहतूक
  • वर नमूद केलेली उत्पादन युनिट पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी तिथल्या कामगारांना आणि त्यांच्या वाहतुकीला परवानगी /  घरातून कारखान्यात आणि  परत जाण्यासाठी पासेस देण्यात यावेत

लॉकडाउन उपायांमध्ये नमूद केल्याप्रमाणे वरील प्रत्येक क्रियेत सामाजिक अंतर आणि योग्य स्वच्छता पद्धती राखण्यावर या पत्रात भर देण्यात आला आहे. या  निकषांचे  पालन सुनिश्चित करणे ही संघटना / आस्थापना प्रमुखांची जबाबदारी असेल. जिल्हाअधिकाऱ्यांना कडक अंमलबजावणी सुनिश्चित करायला सांगितले आहे. जिल्हा प्रशासन आणि फील्ड एजन्सी याना कठोर पालनासाठी वरील गोष्टींबाबत  विशेषत: वैद्यकीय ऑक्सिजनच्या पुरवठासंदर्भात.जागरूक करता येईल.

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 (Release ID: 1611750) Visitor Counter : 259