नागरी उड्डाण मंत्रालय

देशाच्या विविध भागात आत्तापर्यंत 132 लाईफलाईन उडान विमानांद्वारे 184 टन वैद्यकीय साहित्याची वाहतूक

Posted On: 06 APR 2020 3:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 एप्रिल 2020

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या लाईफलाईन उडान उपक्रमांतर्गत दुर्गम व डोंगराळ भागासह भारतातील विविध भागात वैद्यकीय साहित्याची वाहतूक करण्यासाठी आजपर्यंत132 मालवाहू विमानांचे उड्डाण झाले आहे. एअर इंडिया, अलायन्स एअर, आयएएफ आणि खाजगी विमान कंपन्यांच्या सहकार्याने लॉकडाऊन कालावधीत 184 टनपेक्षा जास्त वैद्यकीय सामुग्रीचा पुरवठा आजपर्यंत करण्यात आला आहे.

एअर इंडिया आणि आयएएफने लडाख, कारगिल, दिमापूर, इंफाळ, गुवाहाटी, चेन्नई,अहमदाबाद, जम्मू, कारगिल, लेह, श्रीनगर, चंदीगड आणि पोर्ट ब्लेअरशी सहयोग केला आहे.

आंतरराष्ट्रीय

शांघाय आणि दिल्ली दरम्यान हवाई सेतू उभारला. एअर इंडियाने पहिले मालवाहू विमानाचे उड्डाण 4 एप्रिल 2020 रोजी केले आणि 21 टन वैद्यकीय उपकरणे आणली. चीनमधून आवश्यकतेनुसार आपत्कालीन वैद्यकीय उपकरणे आणण्यासाठी एअर इंडिया मालवाहू विमानांचे उड्डाण करणार आहे.

खाजगी विमानसेवा

देशांतर्गत मालवाहतूक विमान कंपन्या : ब्ल्यू डार्ट, स्पाइसजेट आणि इंडिगो व्यावसायिक आधारावर मालवाहू उड्डाणे चालवित आहेत.

स्पाइसजेटने 24 मार्च ते 5 एप्रिल 2020 पर्यंत 174 विमानांद्वारे 2,35,386 किमी अंतर कापून1382.94 टन मालवाहतूक केली. यापैकी 49 आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाणे होती. ब्लू डार्टने 25  मार्च ते 4 एप्रिल 2020 पर्यंत 52 देशांतर्गत मालवाहू विमानांचे उड्डाण करून  5,00,86किमी अंतर कापून 760.73 टन मालवाहतूक केली. इंडिगोने -23 मार्च ते 4 एप्रिल 2020 या काळात 8 मालवाहू विमानांद्वारे 6103 किमी अंतर कापून 3.14 टन मालवाहतूक केली.

टीपः इंडिगोने 05.4.2020 रोजी कोणतेही उड्डाण केले नाही.

टीप : इंडिगोच्या मालवाहतुकीमध्ये शासकीय मालवाहतूक देखील समाविष्ट आहे ज्यामध्ये विनामूल्य तत्वावर औषधांचा पुरवठा केला जातो.

याबाबतच्या अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा:

 

 

 

 

U.Ujgare/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1611703) Visitor Counter : 204