गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
कोविड-19 चे परीक्षण करण्यासाठी आज्ञा आणि नियंत्रण कक्षात स्मार्ट सिटी अभियानाच्या संकलित माहिती फलकाचा उपयोग
Posted On:
06 APR 2020 2:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 एप्रिल 2020
पुणे, सूरत, बेंगळुरू आणि तुमकुरू ही स्मार्ट शहरे त्यांच्या शहरांच्या वेगवेगळ्या प्रशासकीय विभागात कोरोना विषाणूच्या स्थितीबद्दल अद्ययावत माहिती देण्यासाठी माहिती विश्लेषक आणि त्यांच्या (आयसीसी) संगणक आणि संप्रेषण प्रणालीसह (अनेक शहरात कोविड-19 नियंत्रण कक्ष म्हणून कार्यरत) काम करणाऱ्या माहिती तज्ञांनी विकसित केलेल्या संकलित माहिती फलकाचा वापर करीत आहेत.
पुणे: पुणे स्मार्ट सिटी विकास महामंडळाने (पीएससीडीसीएल) पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) सहकार्याने कोरोना विषाणूच्या जागतिक साथीच्या आजाराशी लढण्यासाठी शहराच्या प्रयत्नात संकलित माहिती फलक (खाली छायाचित्र पहा) विकसित करण्यासाठी सहकार्य केले आहे. शहरातील प्रत्येक घटकाच्या मोजमापासाठी भौगोलिक-स्थानिक माहिती प्रणालीचा वापर करण्यात आला आहे आणि शहर प्रशासन त्या भागावर लक्ष ठेवून आहे तसेच कोविड-19 संसर्गग्रस्त रुग्णांसाठी तिथे बफर झोन तयार करीत आहे. उष्णता मापक तंत्रज्ञान आणि भविष्यसूचक विश्लेषणाचा वापर करून शहर प्रशासन एक प्रतिबंधात्मक उपाययोजना विकसित करेल आणि प्रतिबंधात्मक विभाग माहिती संकलक फलकावर प्रतिबिंबित होतील. शहरातील “नायडू संसर्गजन्य रोग रुग्णालय” मधील आरोग्य सेवा या सुविधेद्वारे कळू शकतात. स्मार्ट सिटी संकलित माहिती फलकाद्वारे विलगीकरण सुविधांची माहिती तसेच संशयित रुग्णांच्या तब्येतीचा आढावा आणि घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांचे संपर्क कळू शकतात.
सुरत: नागरिकांना नियमित अद्ययावत माहिती कळावी यासाठी सूरत महानगरपालिकेने आपल्या संकेतस्थळावर ऑनलाईन माहितीफलक प्रकाशित केला आहे. चाचणी केलेल्या, पुष्टी केलेले, सक्रिय, पुनर्प्राप्त आणि मृत्यूच्या प्रकरणांची एकूण आकडेवारी प्रदान करण्याव्यतिरिक्त, हा फलक शहरामध्ये कोविड -19 च्या एकत्रित प्रकरणांच्या (प्रत्येक दिवस) संदर्भात, प्रसाराची आकडेवारी आणि नमुने प्रदान करतो तसेच रोगाची नवीन पुष्टी झालेल्यांची संख्या (तारीखनिहाय), त्यांचे वयानुसार, विभागनिहाय आणि लिंगनिहाय विवरण याबद्दलची माहितीही दर्शवितो.
बाधित भागाचे स्थानिक विहंगावलोकानही नागरिकांना याद्वारे करता येते. माहिती संकलन फलक यावर बघू शकता-: https://www.suratmunicipal.gov.in/others/CoronaRelated
खाली विस्तृत माहिती दिली आहे.
बंगळुरू आणि तुमकुरू:
बृहन बंगळुरू महानगरपालिकेने विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 8 किलोमीटर परिघातील बाधित रुग्णावर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नियंत्रण कक्ष उभारला आहे.
कोविड-19 माहिती संकलक फलकाचा उपयोग करून बृहन बंगळुरू महानगरपालिका कोरोना विषाणू प्रसाराविषयी दैनिक प्रसारित करते. तारीख-वार, विभागनिहाय, रुग्णालयनिहाय, वय-वार आणि लिंगनिहाय तपशील या नियंत्रण कक्षात संकलित केला जातो आणि दररोज प्रकाशित केला जातो.
एकात्मिक आज्ञा आणि नियंत्रण कक्ष
कोविड-19 विरोधात नियंत्रण कक्ष म्हणून सार्वजनिक ठिकाणांवर सीसीटीव्ही द्वारे पाळत ठेवणे, भौगोलिक-स्थानिक माहिती प्रणालीचा वापर करून बाधित रुग्णांचा छडा लावणे, आरोग्यविषयक कर्मचाऱ्यांची जीपीएस प्रणालीद्वारे माहिती ठेवणे त्याचबरोबरीने विषाणू प्रसार रोखण्यासाठी शहराच्या विविध भागात डॉक्टर्स आणि आरोग्यसेवेत असलेल्या व्यक्तींना व्हर्च्युअल (दूरस्थ) प्रशिक्षण, रुग्णवाहिका आणि निर्जंतुकीकरण सेवांचा वेळोवेळी आढावा,व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वैद्यकीय सेवा आणि टेली-समुपदेशन आणि टेली-मेडिसीनची माहिती देणे इत्यादी कामे एकात्मिक आज्ञा आणि नियंत्रण कक्ष करीत आहे.
U.Ujgare/V.Joshi/P.Malandkar
(Release ID: 1611672)
Visitor Counter : 332