अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
अन्नप्रक्रिया उद्योगाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय संबंधित विभागांसोबत काम करत आहे: हरसिमरत कौर बादल
एफपीआय मंत्र्यांनी कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान उद्योग प्रतिनिधींसोबत दुसरी व्हिडीओ कॉन्फरन्स
Posted On:
05 APR 2020 2:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 एप्रिल 2020
अन्नप्रक्रिया उद्योगाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय नियमितपणे संबंधित विभागांसोबत काम करत आहे असे केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा नवीन जोमाने कामाला सुरुवात करण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योगाच्या विकासासाठी सरकारकडून आवश्यक असणाऱ्या हस्तक्षेपासंदर्भातील सूचनांवर चर्चा करण्यासाठी एफपीआय मंत्र्यांनी 4 एप्रिल 2020 रोजी फिक्की, सीआयआय, असोचॅम, पीएचडीसीसीआय आणि इतर प्रमुख उद्योग संघटनांसोबत दुसरी व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित केली होती. व्हिडीओ कॉन्फरन्स दरम्यान, अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यापार सुलभीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून घेतल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांची आणि पहिल्या व्हिडीओ कॉन्फरन्समधून प्राप्त मुद्यांच्या स्थितीबद्दल माहिती दिली.
मंत्रालयाने सांगितले की, उद्योगांना भेडसावणाऱ्या सूक्ष्म अडचणी सोडविण्यासाठी, अन्न आणि औषधांच्या उपलब्धतेसाठी पुरवठा साखळी तसेच रसद व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी स्थापन केलेल्या तक्रारी कक्षाने त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या सुमारे 348 प्रश्नांपैकी 50 टक्के प्रश्नांचे निराकरण केले असून उर्वरित प्रश्न सोडवण्याच्या मार्गावर आहेत. उद्योगातील सदस्यांनी सांगितले की गोष्टी पूर्वपदावर येत आहेत आणि मंत्रालयाकडून त्यांना मोठा दिलासा दिला जात आहे.
लॉकडाऊन संपल्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योगाचे कामकाज सुरळीत व्हावे यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी उद्योग प्रतिनिधींकडून सूचना मागविल्या आहेत. मजुरांना परत आणण्याची गरज आहे यासाख्या चिंता यावेळी उद्योग प्रतिनिधींनी व्यक्त केल्या; त्यासाठी विशेष गाड्यांची गरज भासू शकेल अशी सूचना त्यांनी केली; उद्योग प्रतिनिधींनी नकदीच्या तुटवड्याचा मुद्दा देखील उपस्थित केला आणि कृषी उत्पादनांच्या खरेदीसाठी कार्यशील भांडवलाची आवश्यकता देखील पडणार आहे; त्यासोबतच ईशान्येकडील प्रदेशात काम करण्यासंदर्भात चिंता देखील व्यक्त केली.
हरसिमरत कौर बादल यांनी उद्योग प्रतिनिधींकडून आलेल्या सूचनांसाठी त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या सर्व समस्या संबंधित विभागाकडे वर्ग करण्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाने आरोग्यदायी आणि सुरक्षित रहावे ही शुभेच्छा देऊन कौर यांनी ही बैठक संपविली.
एफपीआय राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी उद्योग प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे कौतुक केले आणि ईशान्येकडील विविध राज्यांसमवेत हे विषय मांडण्याची सूचना दिली.
G.Chippalkatti/S.Mhatre/P.Kor
(Release ID: 1611374)
Visitor Counter : 208
Read this release in:
English
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Tamil
,
Telugu
,
Kannada